प्रमोद सस्ते / मोशी इंद्रायणी नदीचे पाणी हवेली आणि खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र देहू आणि आळंदी या पुण्यभूमीमध्ये असलेल्या चिखली, तळवडे, मोई, मोशी, चिंबळी, डुडुळगाव, केळगाव, चऱ्होली, गोलेगाव, मरकळ आदी ठिकाणच्या गावातील शेतकरीवर्गांना शेतीसाठी व पिण्यासाठी तसेच जनावरांना पिण्यासाठी या पाण्याचा फायदा व्हावा म्हणून जलसंपदा विभाग महाराष्ट्रा शासनाने इंद्रायणी नदीवर देहू ते मरकळ या ठिकाणी जवळपास सहा ते सात बंधारे बांधले आहेत. या परिसरात उन्हाळ्यात शेतीला व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून शासनाच्या वतीने दर वर्षी उन्हाळा सुरू झाला की बंधाऱ्यांना ढापे टाकून पाणी आडविले जाते़ परंतु, त्या अगोदरपासूनच जलपर्णीने वेढले जाते. त्यामुळे संपूर्ण नदीपात्रातील पाणी दूषित झाले आहे.जलपर्णी बरोबरच पिंपरी-चिंचवड हद्दीतील तळवडे, चिखली, एमआयडीसीचे साडपांणी व आॅइल मिश्रित रासायनिक पाणी थेट या इंद्रायणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी पूर्णपणे दूषित होत आहे़ त्यामुळे जलपर्णी कुजली असल्याने माशांसह इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.महापालिका प्रशासन व अधिकारी यांच्याकडून अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे इंद्रायणी नदीत रसायन मिश्रित पाणी सोडण्यात येणाऱ्या कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे अशा कंपनीधारकांना कोणत्याही प्रकारचा वचक राहिला नसून, ते बिनदिक्कतपणे असे रसायन मिश्रित पाणी नदीत सोडत आहेत. याबाबत वेळीच दखल घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.जलपर्णीमुळे बांधण्यात आलेल्या सहाही बंधाऱ्यात पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याने शेतकरीही त्रस्त झाले आहेत.
जलपर्णीने कोंडतोय श्वास
By admin | Published: April 26, 2017 3:52 AM