आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी तत्कालीन आघाडी सरकारने सुमारे सव्वा दोनशे कोटी रुपयांचा निधी विकास आराखड्याच्या माध्यमातून जाहीर करून आळंदीत येणाऱ्या राज्य परिसरातील भाविकांसाठी विविध सेवा-सुविधा देण्यासाठी तीर्थक्षेत्र विकासाचा मार्ग मोकळा होणार होता. मात्र गेल्या चार वर्षांत भूसंपादनासाठी फारसा निधी उपलब्ध न झाल्याने आळंदीसह राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांतील विकास जागांचे भूसंपादनाअभावी विकास खुंटला होता.
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध विकासकामांचा आढावा घेत सुमारे १५० कोटी रुपयांचा भरीव निधी भूसंपादनासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत जाहीर केला. यामुळे देवाच्या आळंदीतील नागरिकांसह भाविकांना विविध सेवा- सुविधा मिळण्याचा मार्ग आता प्रशस्त होणार आहे. या निर्णयाने राज्यातील इतर तीर्थक्षेत्र विकासासह आळंदी विकास आराखड्यातील भूसंपादनासाठी लागलेले विलंबाचे ग्रहण सुटणार आहे. या शासन निर्णयाचे आळंदीत स्वागत केले आहे.आळंदीत शासन निर्णयाचे जोरदार स्वागत...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आराखड्यातील विविध विकासकामांच्या जागांसाठीच्या भूसंपादनाला सुमारे १५० कोटी रुपये भरीव निधी देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे राज्यातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामांना लागलेले विलंबाचे ग्रहण सुटणार आहे. यामुळे त्यांनी घेतलेल्या शासन निर्णयाचे आळंदी नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक सागर भोसले, नगरसेविका प्रमिला रहाणे आदींनीस्वागत केले आहे.तीर्थक्षेत्र आळंदीच्या विकासाला गती मिळणारराज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून तीर्थक्षेत्र आळंदीत विविध विकासकामे सुरु आहेत. यातील विविध विकासकामांतील जागांच्या भूसंपादनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आळंदीलादेखील निधी उपलब्ध होणार असल्याने आळंदीतील भूसंपादनाच्या जागा विकासाला उपलब्ध होऊन विकासकामांना गती मिळणार असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.