शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

बंदी झुगारून वॉशिंग सेंटर सुरूच

By admin | Published: September 14, 2015 4:37 AM

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी असल्याच्या पार्श्वभुमीवर शहरातील सर्व वॉशिंग सेंटर व जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी असल्याच्या पार्श्वभुमीवर शहरातील सर्व वॉशिंग सेंटर व जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. मात्र बंदी झुगारून शहरामध्ये अनेक ठिकाणी वॉशिंग सेंटर सुरूच आहेत. त्यांच्या तपासणीसाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयस्तरावर भरारी पथके नेमण्यात आली असूनही त्यांच्याकडून फारशी तपासणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. धरणसाठ्यातील पाणी पुढील वर्षभर (१५ जुलै २०१६) पाणी पुरविण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे उभे टाकले आहे. यादृष्टीने पाण्याचा गैरवापर रोखण्याच्या सक्त सुचना देण्यात आल्या आहेत. त्याकरिता क्षेत्रिय कार्यालयस्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. भरारी पथकांना ४ प्रकारच्या पाणी गैरवापराची तपासणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. वॉशिंग सेटर व जलतरण तलावासाठी होणारा पाण्याचा वापर अत्यावश्यक नसल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र शहरामध्ये सर्रास वॉशिंग सेंटर सुरू आहेत.गोखले नगरमधील पंपींग स्टेशनजवळील वॉशिंग सेंटर रविवारी दिवसभर सुरू होते. वाहनांच्या शोरूममधील वॉशिंग सेंटर सुरूच आहेत. कोथरूड, हडपसर, येरवडा, चंदननगर, वारजे, सिंहगड रस्ता उपनगरांमध्ये खुलेआमपणे वॉशिंग सेंटरमध्ये गाड्या धुतल्या जात आहेत.भरारी पथकांमध्ये गैरवापराच्या तपासणीसाठी जबाबदारी सोपविली आहे. (प्रतिनिधी)