शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

जीएसटीनंतरही राज्यात एलबीटीची वसुली, पिंपरी-चिंचवड चेंबर आॅफ इंडस्ट्रीजचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 1:09 AM

जीएसटी लागू झाल्यानंतरही एलबीटी बंद झालेली नाही. राज्य सरकारकडून छुप्यापद्धतीने एलबीटी वसूल होत आहे. यातून शासनाची तिजोऱ्या भरण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड चेंबर आॅफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांनी केला.

पिंपरी - जीएसटी लागू झाल्यानंतरही एलबीटी बंद झालेली नाही. राज्य सरकारकडून छुप्यापद्धतीने एलबीटी वसूल होत आहे. यातून शासनाची तिजोऱ्या भरण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड चेंबर आॅफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांनी केला.आप्पासाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी माहिती दिली. या वेळी उपाध्यक्ष प्रेमचंद मित्तल, सचिव रंगनाथ गोडगे-पाटील उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ‘‘जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीपासून सर्व राज्यांनी एलबीटीसह स्थानिककर वसूल करायचे नाहीत, असे केंद्रीय वित्त मंत्रालय, जीएसटी नियंत्रण समिती, केंद्रीय कर नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय मंडळाचा निर्णय लोकसभा, राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी मंजूर केला आहे. हा जीएसटी कायदा व त्याच्या अंतिम मसुद्यास महाराष्ट्रासह इतर राज्यांनी मान्यता कळविली आहे. त्यानंतर जीएसटी कायदा अंमलात आला. राज्यकारभारी केंद्रीय कायद्याचे उल्लंघन करीत जनतेला लुबाडत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.एलबीटी त्वरित रद्द करासरकारने १ टक्का एलबीटी त्वरित रद्द करावी़ आजपर्यंत जमा केलेली एलबीटी रक्कम व स्टॅम्प ड्युटीची ४ टक्क्यांपेक्षा अधिक आकारलेली १ टक्क्याची रक्कमही संबंधितांना व्याजासह परत करावी. तसेच इंधन दरात होत असलेली वाढ ही तेल कंपन्यांची मक्तेदारी राष्ट्रपतींनी वटहुकूम काढून संपवावी़ परदेशी कंपन्यांवर सवलतींची खैरात करणाºया सरकारने देशातील कंपन्यांनाही सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी शिंदे यांनी केली आहे.नोटबंदीनंतरही अर्थव्यवस्थेतील काळ्या पैशांमुळे कॅशलेसला हरताळ फासला आहे. रोजगारनिर्मितीत अर्थव्यवस्थेला अपयश आले आहे. ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’मध्ये भारत जगात ७७ व्या क्रमांकावर आल्याचे परदेशी कंपन्यांबाबतीत खरे असले तरी भारतीय कंपन्यांबाबतीत ‘जैसे थे’ अशीच परिस्थिती आहे.- आप्पासाहेब शिंदे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड चेंबर आॅफ इंडस्ट्रीज.जनतेची होतेय लुबाडणूक१ जुलै २०१७ पासून एलबीटी वसूल करण्यास बंदी असतानाही महाराष्ट्रात मात्र १ टक्का एलबीटी हा मुद्रांक कायद्याच्या कक्षेत येणाºया दस्तावर आजही घेतला जात आहे. तसेच जीएसटी धोरणानुसार स्टॅम्प ड्युटीदेखील सर्व राज्यांनी चार टक्क्यांपेक्षा अधिक आकारायची नाही, असे ठरलेले असताना महाराष्ट्रात पाच टक्के स्टॅम्प ड्युटी आकारला जात आहे.

टॅग्स :TaxकरGSTजीएसटी