पिंपरी : नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, विविध पदांवर निवड अशाप्रकारच्या शुभेच्छा देण्यांसह इतर राजकीय जाहिरातींमुळे एरवी शहरातील भरणारे मोठमोठे होर्डिंग्ज आता मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या होर्डिंग्जवरील राजकारणी गेले कुणीकडे, असा उपरोधिक प्रश्न उपस्थित होत आहे. पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात मोठमोठे होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. यासह चौकाचौकात देखील होर्डिंग्जवर जाहिराती झळकलेल्या पहायला मिळतात. वाढदिवस, एखाद्या पदाधिकाऱ्याची निवड अथवा इतर शुभेच्छापर जाहिराती या फलकांवर झळकतात. मात्र सध्या पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असून राजकीय पक्षांच्या जाहिरातींना मर्यादा आली आहे. जाहिराती लावल्यास त्याबाबतचा खर्च निवडणूक विभागाला सादर करावा लागणार आहे. यामुळे सध्या शहरातील राजकीय जाहिरात फलक खाली उतरले आहेत. फलकांची जागा आता इतर जाहिरातींंनी घेतली आहे.(प्रतिनिधी)
होर्डिंग्जवरील नेते झाले गायब
By admin | Published: February 07, 2017 3:08 AM