शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

थकबाकीदारांच्या घरी लाइनमनने पाडला ‘उजेड’

By admin | Published: June 06, 2016 12:27 AM

वीज बिलाची थकबाकी असतानाही त्याच ठिकाणी त्याच ग्राहकांना नवीन वीजमीटर जोड देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महावितरणच्या भोसरी विभाग देहू-आळंदी रस्ता येथे

पिंपरी : वीज बिलाची थकबाकी असतानाही त्याच ठिकाणी त्याच ग्राहकांना नवीन वीजमीटर जोड देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महावितरणच्या भोसरी विभाग देहू-आळंदी रस्ता येथे हे जोड दिले गेले आहेत. महावितरणच्या लाइनमनने हे जोड बेकायदापणे दिल्याचे समोर आले आहे. यामुळे महावितरणचे आर्थिक नुकसान झाले आहे. देहू-आळंदी रस्ता, चिखली, जाधववाडी येथील गट क्रमांक ११६ सल्लाउद्दीन सफी मोहम्मद शहा (ग्राहक क्रमांक १७१५६१३८४११७) आणि गट क्रमांक ३४ येथे याकुब एन्टरप्रायेजस (वाय. एम. मत्ताअल्लाहखा) (ग्राहक क्रमांक १७१५६१३८२२२०) या नावाने वीजजोड होती. शहा यांनी ६ हजार ९४० रुपये आणि मत्ताअल्लाहखा यांनी ८ हजार ३८० रुपये बिल थकवले होते. ही थकबाकी वसूल न करताच त्याच नावाने पुन्हा त्यांना नवीन वीजजोड देण्यात आले आहेत. त्यांचा ग्राहक क्रमांक अनुक्रमे १७१५६१७३४६९० आणि १७०१०७७३९१३३ असा आहे. तसेच, याच भागातील महादेव एस. जाधव यांच्या नावाने असलेले (ग्राहक क्रमांक १७१५६१७३४०११) सुमारे ३ हजार ५६० युनिटचे बिल थकीत होते. ही थकबाकी वसूल न करता तेथील मीटर परस्पर गायब करण्यात आला. सध्या त्याच व्यक्तीच्या नावाने त्याच ठिकाणी नवीन मीटरजोड देण्यात आला आहे. सदर प्रकारात महावितरणच्या कर्मचारी लाइनमनने दिशाभूल करून, संगनमत करून, हे नवे वीजमीटर जोड दिल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी केली आहे. नवीन वीज मीटरजोड देताना संबंधित विभागातील लाइनमन पाहणी करतो. मागील थकबाकी आहे का, हे तपासतो. त्याच्या अहवालावरुन मीटरजोड देण्याचा निर्णय सेक्शन इंजिनिअर घेतात. इंजिनिअर प्रत्यक्ष जाऊन पाहणी करीत नाहीत. त्याचा फायदा घेत लाइनमनने हा प्रकार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आर्थिक फायद्यासाठी हा प्रकार झाला असून, त्यामुळे महावितरणचे आर्थिक नुकसान झाले आहे. याचप्रकारे अनेक घटना शहरात घडत आहेत. दोषींवर कारवाई करण्याची मागणी सौंदणकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)