पिंपरी: दिघी, चऱ्होली परिसरामध्ये परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या आढळून आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाच्या पथकाने शोधाशोध सुरू केली आहे.
आळंदी पुणे रस्त्यावरील दिघी चऱ्होली परिसर आहे. त्या भागामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर शेती आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागात बिबट्या दिसून आल्याच्या तक्रारी वन व भागाकडे करण्यात आले होत्या. त्यानुसार वनविभागाने शनिवारपासून या परिसरात तपासणी सुरू केली आहे. रविवारी सकाळपासूनच रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल झाले आहे. बिबट्याच्या ठशांचा शोध घेतला जात आहे.
कॅमेरे लावण्याचे काम सुरू
ज्या परिसरात बिबट्या आढळून आला आहे. त्या परिसरातील शेतामध्ये वनविभागाच्या वतीने कॅमेरे लावले जात आहेत. त्या माध्यमातून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. आज सकाळपासूनच वनविभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर अनिल राठोड यांच्यासह आठ जणांचे पथक या परिसरामध्ये तपासणी करत आहे.
वनविभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर अनिल राठोड म्हणाले, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्याचे वास्तव्य असल्याच्या तक्रारी आहेत त्या ठिकाणी म्हणजेच साई मंदिरापासून चरोलीपर्यंतच्या भागापर्यंत असणाऱ्या शेतीच्या परिसरामध्ये तपासणी सुरू आहे तसेच ठीक ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. त्यातून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. दिवसा या भागात एकदाही बिबट्या बाहेर आलेला नाही रात्री या भागात बिबट्या फिरत असल्याचे आढळून येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये. शेतकऱ्यांनीही एकट्याने शेतात जाऊ नये. काळजी घ्यावी, बिबट्या आढळल्यास वनविभागास कळवावे.