रहाटणी : शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून पालिका प्रशासनाकडून वर्षाकाठी करोडो रुपये खर्च केले जातात. मात्र याचा खरंच फायदा होतो काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सध्या पडल्याशिवाय राहात नाही.शहरात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत फ्लेक्स लावू नये व शहर विद्रूप करू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत़ सर्वच नियम धाब्यावर बसवून अनेक मुरब्बी राजकारणी व स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते स्वत: च्या जाहिरातबाजीसाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावीत आहेत. हे सर्व होत असताना पालिकेचे आकाश चिन्ह परवाना विभाग व अतिक्रमण विभाग मूग गिळून गप्प असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील रहिवासी संबंधित अधिकाऱ्यांच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.सध्या शहरात कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नसल्याने या ना त्या कारणाने प्रकाश झोतात राहण्यासाठी राजकारणी धडपड करीत आहेत़ त्यामुळे शहरातील रस्ता म्हणू नका, चौक म्हणू नका, जागा दिशेल त्या ठिकाणि फलक लावले जात आहेत. रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, यांसह शहरातील अनेक परिसरात असे अनधिकृत फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा फलक आतापासूनच लावण्यास राजकीय व्यक्तींची चढाओढ सुरू झाली आहे. नंतर फ्लेक्स लावायला जागा मिळते की नाही म्हणून आतापासूनच फ्लेक्स लावण्यास सुरुवात केल्याने चौकांना बकालपणाचे स्वरूप आलेले दिसून येत आहे़ रहाटणी येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौक, कोकणे चौक, नखाते वस्ती चौक, रहाटणी फाटा, तापकीर चौक, पाचपीर चौक, बाजीप्रभू चौक यांसह अनेक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्सचे जाळे पसरले आहे.फ्लेक्स लावणाºयांवर कारवाई कराशहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्सचे पेव दिवसेंदिवस वाढत आहे़ मात्र हे अनधिकृत फ्लेक्स काढण्यासाठी शहरातील रहिवाशांच्या करातील पैसातून ठेकेदारांची नेमणूक करून हे अनधिकृत फ्लेक्स काढले जातात़ त्यापेक्षा जे कोणी फ्लेक्स लावले आहेत त्यांच्याकडूनच दंड वसूल केला तर त्यांनाही जरब बसेल व या शहरातील सर्वसामान्य नागरिकांचा पैसाही वाचेल. अनेक व्यावसायिक फ्लेक्सवर त्यांचा मोबाइल किंवा लँडलाइन क्रमांक असतो तर राजकीय पुढाºयांच्या नावाची परिसरात गवगवा असतो़ त्या व्यक्तीवर कारवाई का होत नाही, फ्लेक्स काढण्यासाठी महापालिका प्रशासन तिजोरीतून लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा ज्यांनी फ्लेक्स लावले आहेत त्यांच्याकडून दंड वसूल केला तर भविष्यात याला आळा बसणार आहे.महापालिका ठेकेदार पोसण्याचे काम करते की काय?राजकीय व्यक्तींनी अनधिकृत फ्लेक्स लावायचे, शहराला बकालपणाचे स्वरूप देयाचे व त्यांनीच महापालिका अधिकारी कामच करत नाहीत म्हणून आरडाओरड करायची व आपल्याच एखाद्या कार्यकर्त्याला शहरातील अनधिकृत फ्लेक्स काढण्याचा ठेका मिळविणे, अशी परिस्थिती सुरू आहे़ रहाटणी काळेवाडीत तर दीपावलीच्या शुभेच्छा फलक तसेच बांधकाम व्यावसायिकांचे फ्लॅट विक्रीचे फ्लेक्स अद्याप परिसरातील विद्युत खांबावर झळकताना दिसून येत आहेत. काही ठिकाणच्या वळणावर तर वाहनचालकांना वळणावरून येणारे वाहनही दिसून येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र शासनाच्या नियमाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. याकडे पालिका प्रशासनाचा संबंधित विभाग का लक्ष देत नाही हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.
फ्लेक्सबाजी : आकाश चिन्ह परवाना विभाग नेमके करतोय काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 12:53 AM