वाकड : परिसरात लायन्स क्लब आॅफ वाकडच्या प्रेसिडेंट डॉ. सुगंधा जोहर व व्हाईस प्रेसिडेंट शिवाजी कटके यांनी व्यक्तिगतरीत्या बरेच प्रयत्न करून व संशोधन करून एक उत्तम प्रयोग केला आहे. त्यात आपल्या घरच्या नळाला प्लॅस्टिकचीच पण जरा वेगळी अशी पाईप लावल्यास बऱ्याच अंशी पाण्याची बचत होईल. घरातील प्रत्येक नळातून साधारणपणे दर मिनिटाला वीस लिटरपर्यंत पाणी वाहते. त्या ऐवजी ‘वॉटर सेव्हिंग’ लावल्यास मिनिटाला फक्त तीन ते चारच लिटर पाणी जाते. म्हणजे दर वेळेस नळ उघडला की मिनिटाला सोळा ते सतरा लिटर पाणी वाचते. विशेष म्हणजे याचा आपल्याला वापरण्यात काहीच फरक होत नाही. सर्व वॉश बेसिनच्या नळांना आणि ड्राय बाल्कनीच्या नळांना बसवले, तर घरटी तीस ते पन्नास टक्के पाणी बचत निश्चितपणे होईल, असे डॉ. जोहारांचे म्हणणे आहे. वाकडमधील पलाश सोसायटी हा उपक्रम राबविणार असल्याचे जोहर यांनी सांगितले. पाणी वाचविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. (वार्ताहर)घरातील प्रत्येक नळातून साधारणपणे दर मिनिटाला वीस लिटरपर्यंत पाणी वाहते. त्या ऐवजी ‘वॉटर सेव्हिंग’ लावल्यास मिनिटाला फक्त तीन ते चारच लिटर पाणी जाते.
पाणी वाचविण्यासाठी ‘लायन्स’चा पुढाकार
By admin | Published: March 31, 2017 2:48 AM