पिंपरी : भोसरी, भगतवस्ती परिसरातून गायब झालेली साडेचार वर्षांची आलिया ही चिमुकली तब्बल सात तासाने सुखरूप घरी पोहचली. आलिया खेळता खेळता घरापासून दीड किलोमीटर अंतर पुढे गेली. घर सापडेना, अखेर ती एका ठिकाणी झोपी गेली. पोलिसांनी तिचा शोध घेतला. रात्री दहा वाजता तिला घरी सुखरूप सोडले. चिमुकली आलिया कोठे गेली हे कळेना, वडील मोहम्मद हैदर खान तसेच आईचा जीव कासावीस झाला. सर्वत्र तिचा शोध घेतला. परंतु तिचा काही थांगपत्ता लागत नव्हता. एकुलती एक मुलगी बेपत्ता झाल्याने आई,वडील चिंताग्रस्त झाले. खान यांनी भोसरी पोलीस ठाणे गाठले. भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखा एक यांच्या पथकाची मदत घेतली. पोलिसांनी काही तासातच चिमुकलीला शोधून काढण्यात आले.आलिया मोहम्मद खान वय साडेचार वर्ष ही चिमुकली शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास गेलेली आलिया रात्र झाली तरी परत आली नाही. त्यामुळे खान कुटुंबिय व्याकुळ झाले. रात्री आठ वाजता भोसरी पोलीस ठाण्यात जाऊन साडेचार वर्षीय आलिया अचानक खेळता खेळता घराबाहेर गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. भोसरी पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले आणि ३५ ते ४० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आलियाची शोध मोहीम सुरू केली. शोध घेण्यासाठी रस्त्यावरील प्रत्येक सीसीटीव्ही फुटेज भोसरी पोलिसांनी तपासले. एका सीसीटीव्हीमध्ये आलिया चालत जात असल्याचे दिसले. यावरूनच पोलिसांनी रात्री दहाच्या सुमारास त्या दिशेने जात दीड किलोमीटर अंतर कापलं. आलिया एमआयडीसी परिसरात रस्त्याच्या कडेला झोपली असल्याचे निदर्शनास आले.तिची शोध मोहीम संपली. अलियाचा शोध घेण्यात भोसरी पोलिसांना यश मिळाले. तब्बल सात तासानंतर आलिया पुन्हा घरी आल्याचे पाहून आई वडिलांचा जीव भांड्यात पडला. त्यांचा चेहरा आनंदाने फुलला, त्याचबरोबर डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. दोघांनी पोलिसांचे आभार मानले.
भोसरी येथून गायब झालेली चिमुकली सात तासाने सुखरूप परतली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 3:06 PM
चिमुकली आलिया कोठे गेली हे कळेना, वडील तसेच आईचा जीव कासावीस झाला. सर्वत्र तिचा शोध घेतला.परंतु,.....
ठळक मुद्दे भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखा एक यांच्या पथकाची घेतली केली मदत ३५ ते ४० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आलियाची शोध मोहीम सुरू