पिंपरी : पुणे-लोणावळा लोहमार्गावर खडकी ते शिवाजीनगर रेल्वे स्थानकादरम्यान पूर्व नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे केली जाणार आहेत. यामध्ये रेल्वे गाड्यांच्या वेळेत सुसूत्रता आणण्यासाठी स्वयंचलित सिग्नलिंगचे काम असणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २५) पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या १५ लोकल गाड्या तर रविवारी (दि.२६) ३१ लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कामामुळे खडकी येथील गुड्स शेड आणि मिलिटरी साईडिंग बंद राहणार आहे. चिंचवड येथील लोडिंगची कामे देखील विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
शनिवारी रद्द केलेल्या लोकल पुणे-लोणावळा लोकल सायंकाळी ६ पासून ते रात्री २३.४५ पर्यंत लोकलच्या १५ फेऱ्या बंद असणार आहेत. गाडी क्रमांक ०१५६५लोणावळा-शिवाजीनगर लोकल शनिवारी (दि.२५) सायंकाळी ०५.३० वाजता लोणावळा येथून सुटणारी पुणे स्थानकापर्यंत धावणार आहे. तसेच रविवारी रद्द केलेल्या लोकल पुणे-लोणावळा लोकल मध्यरात्री १२.१५ पासून ते रात्री ९.४० पर्यंत अशा लोकलच्या ३१ फेऱ्या बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.