'पार्थ, स्वार्थ अन् परमार्थ कोणीही येवो, शिवसेनेचा खासदार जिंकणार' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 08:14 PM2019-03-19T20:14:59+5:302019-03-19T20:16:34+5:30

शरद पवार, अजित पवार, पार्थ पवार, स्वार्थ, परमार्थ कोणीही येऊ देत. आपल्याला काहीच फरक पडत नाही. गेल्यावेळी पेक्षा यंदा जास्त मताधिक्याने युतीचा खासदार निवडून आणू असा निर्धार शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला

Lok Sabha Elections 2019 - Shivsena Leader Nilam gorhe criticism on NCP | 'पार्थ, स्वार्थ अन् परमार्थ कोणीही येवो, शिवसेनेचा खासदार जिंकणार' 

'पार्थ, स्वार्थ अन् परमार्थ कोणीही येवो, शिवसेनेचा खासदार जिंकणार' 

Next

पिंपरी -  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारला उमेदवारी दिली आहे. यावर शरद पवार, अजित पवार, पार्थ पवार, स्वार्थ, परमार्थ कोणीही येऊ देत. आपल्याला काहीच फरक पडत नाही. गेल्यावेळी पेक्षा यंदा जास्त मताधिक्याने युतीचा खासदार निवडून आणू असा निर्धार शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. 

पिंपरीमध्ये शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली, या बैठकीत बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षात देशात असंख्य लोकाभिमुख विकास कामे झाली. शिवसेना - भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी ही विकास कामे जनतेपर्यंत पोहचवावीत. युतीचा धर्म पाळून पुणे जिल्ह्यातील शिवसेना - भाजपचे चारही उमेदवार निवडून आणावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी जीवाचे रान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेस - राष्ट्रवादीला १५ वर्ष जी कामे करता आली नाहीत ती युती सरकारने साडेचार वर्षात केली आहेत. राष्ट्रवादीला कुटुंबातील उमेदवार द्यावा लागला. त्यातून त्यांची हतबलता दिसून येते. राष्ट्रवादीचे शेतकऱ्यांबद्दलचे पुतना मावशीचे प्रेम समोर आले आहे असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रवादीवर केला.  

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, युती झाल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले आहे. मतभेद संपले आहेत. भविष्यात एक कुटुंब म्हणून कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. विरोधकांनी कितीही ओरडू द्या, जनता युतीसोबतच आहे. शिवसेना - भाजप युती कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक लढविते. युतीचा आत्मा कार्यकर्ता आहे. युतीचे कार्यकर्ते तळमळीचे आहेत. विरोधकांना चारीमुंड्या चीत केल्याशिवास कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणूक आपण जिंकणार आहोत. पण गाफील राहू नका असं आवाहन कार्यकर्त्यांना केले. 

Web Title: Lok Sabha Elections 2019 - Shivsena Leader Nilam gorhe criticism on NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.