रजत खामकर - पिंपरी : शहरातील पिंपरी ते दापोडी या मार्गावर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. काम सुरू असताना येथील जुन्या मुंंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक नियमन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे मेट्रो प्रशासनाने असल्याचे वास्तव समोर आले आहे. सुरक्षेच्या कुठल्याही साधनाशिवाय येथे काही कर्मचारी व सुरक्षारक्षक काम करत आहेत. त्यामुळे अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न कर्मचारी करत आहेत. मेट्रोच्या कामाकरिता वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. या कंपनीतर्फे मेट्रो मार्गावर सुमारे १५० कर्मचारी नेमले आहेत. दोन शिफ्टमध्ये हे कर्मचारी विभागले आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण करणे व वाहनचालकांना योग्य दिशा दाखवण्याचे काम हे कर्मचारी करतात. वाहतुकीचे नियमन करत असताना काम सुरू असलेल्या मेट्रोच्या मार्गाखाली उभे राहूनच त्यांना नियमन करावे लागते. या कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी हेल्मेट तसेच सेफ्टी शूज नसल्याचे समोर आले आहे. सुरक्षेचे कोणतेच साधन नसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे वाहतूक नियमन करणाºया कर्मचाºयांना हेल्मेट व सेफ्टी शूजची आवश्यकता आहे. तसेच ज्या मार्गावर काम चालू आहे तेथे संरक्षक जाळी बसवणे आवश्यक आहे. जेणेकरून मेट्रोच्या खालून प्रवास करणाऱ्या वाहनांवर व कर्मचाऱ्यांवर बांधकाम साहित्य पडणार नाही.मेट्रोकडून सुरक्षेचे साधने वापरण्यावर भर दिला आहे. मात्र, ज्या ठेकेदारांना हे काम दिले आहे. त्यांच्याकडून सुरक्षा साहित्यांची किंंमत (बुटासाठी ४०० रुपये) ही कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापून घेतली जाते. मात्र, साहित्य पुरविले जात नाही. त्यामुळे कर्मचारीही पैसे वाचवण्यासाठी हलक्या दर्जाचे बूट वापरतात. मात्र, एखादा अपघात झाल्यानंतर मेट्रो प्रशासन जागे होणार का, असा सवाल सुरक्षारक्षक करीत आहेत. तसेच, मेट्रो प्रशासनाकडे थेट तक्रार केल्यास ठेकेदार कामावरून काढण्याची भिती असल्याने कोणीही तक्रार करण्यास धजावत नाही. ..........महामेट्रो कंपनीने ज्या कंपनीला काम दिले आहे, त्या कंपनीने अतित मॅनेजमेंटला वाहतूक नियमन करण्याचे काम दिले आहे. आम्ही त्या कंपनीला सर्व सुरक्षा कर्मचारी आणि कामगारांना हेल्मेट व सुरक्षा बूट देण्यासंदर्भात सांगितले होते. त्यांना पुन्हा एकदा सांगण्यात येईल आणि सुरक्षा साहित्य सर्वांना पुरवण्यात येईल. - किशोर करंडे, वाहतूक आणि सुरक्षा प्रमुख, पुणे मेट्रो .......
लोकमत ऑन दि स्पॉट : महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा ठेकेदाराच्या भरवशावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 1:33 PM
मेट्रोच्या कामाकरिता वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे....
ठळक मुद्देसुरक्षारक्षक विनाहेल्मेट : सुरक्षेच्या साहित्यांसाठी मात्र वेतनातून कपातकुठल्याही साधनाशिवाय येथे काही कर्मचारी व सुरक्षारक्षक करतात काम