पिंपरी : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात तडीपार गुंडांचा वावर दिसून येत असतो, त्यामुळे पोलिसांची गुंडांच्या हालचालींवर करडी नजर आहे. प्रतिबंधात्मक कारवाईची पावले उचलण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत या संदर्भात पोलीस अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या.गणेशोत्सवात जिल्ह्यातून तडीपार झालेले गुंड शहरात दिसता कामा नयेत, तसेच अन्य ठिकाणाहून तडीपार झालेले. परंतु उत्सव काळात पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल होणारे अशा गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष आहे. शहरातून तडीपार झालेले गुन्हेगार दृष्टीपथास येताच, नागरिकांनी कळवावे, असे आवाहन केले आहे.शांतता समितीची बैठकविविध ठिकाणी संचलन करून पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे पोलिसांनी निदर्शनास आणून दिले आहे. संशयित गुन्हेगारांच्या घराची झडती घेतली आहे. झोपडपट्यांमध्ये गुन्हेगारांच्या घरांची तपासणी केली जात आहे. शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन त्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिसांची उत्सवात गुन्हेगारांवर करडी नजर, प्रतिबंधात्मक कारवाईची पावले उचलण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 4:37 AM