विश्वास मोरे पिंपरी : महापालिकेत सत्ताधारी भाजपाकडून पारदर्शक कारभाराचे ढोल बडविले जात असताना विविध विकास प्रकल्पांसाठी चार ते पाच ठेकेदारांवरच कारभार सुरू आहे. राज्यकर्ते, महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांच्या अळीमिळीमुळे महापालिकेत ठेकेदारांची चलती असून, स्थापत्य विषयक कामे, रस्ते, ग्रेड सेपरेटर आदी प्रकल्पांत रिंगची प्रकरणे उघडकीस येत आहेत. पाच ठेकेदारांवरच महापालिकेची भिस्त असून, खुलेआम जनतेच्या पैशांची लूट होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत रस्ते, ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल आणि स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. या निविदा प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांच्या संबंधित ठेकेदारांचीच चलती आहे. सत्ताधारी, प्रशासन आणिठेकेदारांची रिंग असल्याने जनतेच्या पैशांची लूट होत आहे. गेल्या महिनाभरात स्थापत्यविषयक बारा कामे वाढीव दराने दिल्याने महापालिकेला सुमारे पंचवीस कोटींची भूर्दंड सोसावा लागला आहे. नुकसान झाले आहे. व्ही. एम़ मातेरे, अजवानी, धनेश्वर, बी़ के़ खोसे, क्लीन्सी, एस़ एस़ साठे, कृष्णाई इन्फ्रा, एस़ आऱ कन्स्ट्रक्श्न यांच ठेकेदारांची चलती आहे. स्थापत्यविषयक कामांना हेच ठेकेदार निविदा भरतात. रिंग करून त्यांच्यापैकीच एकाला आळीपाळीने काम मिळत आहे. हे ठेकेदार सत्ताधारी भाजपा आणि विरोधीपक्षातील राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना नेत्यांचे चेले आहेत.वाढीव दरांच्या निविदांना प्राधान्यगेल्यावर्षभरात एकूण ३२ मोठे महत्त्वाकांशी प्रकल्प राबविण्यास मंजुरी देण्यात आली. त्यापैकी सुमारे १२ कामांच्या निविदा या वाढीव दरांच्या आहेत. रस्ते विकास, इमारत बांधणे, बीआरटीमार्ग सुधारणा, ग्रेड सेपरेटरचे काम, एरिया बेस डेव्हलपमेंट अशा विविध कामांत वाढीव दरांच्या निविादांना प्राधान्य दिले आहे. महापालिकेचे एकूण आर्थिक बजेट हे सुमारे साडेचार हजार कोटींचे असून, त्यापैकी सुमारे दीड हजार कोटीची कामे ही स्थापत्य आणि प्रकल्पविषयक कामे असतात. वर्षभरात एकूण ३२ विकास प्रकल्पांपैकी नव्वद टक्के विकास कामांत तेच-तेच ठेकेदार आले आहेत. यावरून महापालिकेतील प्रकल्पांच्या कामांत रिंग होत असल्याचे दिसून येत आहे. १६ निविदामंध्ये केवळ तीनच ठेकेदार आलेले आहेत. तर उर्वरित निविदांमध्ये चार ते पाच ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत.>साडेचार हजार कोटींपैकी दीड हजार कोटीची स्थापत्य विषयक कामे३२ पैकी नव्वद टक्के कामांत ठेकेदार तेच१६निविदांमध्ये तीनच ठेकेदार स्पर्धेतरस्ते विकास, इमारत, बीआरटीमार्ग सुधारणा, ग्रेड सेपरेटरमध्येवाढीव दरांच्या निविदाकामाचे नाव निविदा दर ठेकेदारराजीव गांधी पूल ते २ कोटी ३१ लाख, व्ही़ एम़ मातेरे,डांगे चौक बीआरटी मार्ग, ७३ हजार ४२४ श्री कन्स्ट्रक्शन, अजवानी, आणि धनेश्वरभोसरी ते वाकड २ कोटी ४६ लाख धनेश्वर, श्रीगणेश,बीआरटी मार्ग १० हजार १३४ अजवानीप्रभाग तीनमधील ३८ कोटी २४ लाख धनेश्वर,तीस मीटर रस्ता ७० हजार ४९५ इंगवले पाटील, अजवानी, कृष्णाई इन्फ्राचºहोली ते १२ कोटी ९ लाख श्रीगणेश,साई मंदिर रस्ता ६३ हजार ६३४ मोहनलाल मथाराणी, इंगवले पाटीलपुणे-आळंदी रस्ता ४२ कोटी ९५ लाख कृष्णाई, धनेश्वर,५६ हजार ९८२ मनीषा कन्स्ट्रक्शनपुणे-आळंदी ४१ कोटी ८९ लाख धनेश्वर, कृष्णाई,रस्ता टप्पा दोन ९७ हजार ३८२ आणि अजवानीमोशी आळंदी २५ कोटी १४ लाख इंगवले पाटील,कुदळवाडी रस्ता ४३ हजार २१४ मोहनलाल मथाराणी,व्ही़ एम़ मातेरेचºहोलीतील २५४ रस्ता १६ कोटी ४१ लाख श्रीगणेश, क्लीन्सी,१९ हजार ६६ धनेश्वर कन्स्ट्रक्शनचिखली दवाखाना १ कोटी ९८ लाख नागनी पीएम,५८हजार ८०५ पवार पाटकर, हिरेनकामाचे नाव निविदा दर ठेकेदारचिखली संतपीठ ४० कोटी ६१ लाख बी.के. खोसे, व्ही़ एम़ मातेरे,१० हजार १२५ एसएस साठे,चºहोलीतील अठरा २५ कोटी ४ लाख मथाराणी, इंगवले पाटील,मीटर रस्ता ३४ हजार ४१४ व्ही़ एम़ मातेरे,विशालनगर १३ कोटी २८ लाख एसएस साठे, क्लीन्सी,जगताप डेअरी रस्ता २३ हजार ३३२ अजवानी इन्फ्राआकुर्डी रेल्वे स्टेशन ते ११ कोटी ८६ लाख क्लीन्सी,बास्केट पूल रस्ता १३ हजार २६७ एसएस साठे, अजवानीआकुर्डी ते पीसीपी रस्ता ७ कोटी ३४ लाख अजवानी,४३ हजार ५२५ क्लीन्सी, एसएस साठेबीआरटीमार्ग वाकड १९ कोटी ५८ लाख कृष्णाई, व्ही़ एम़ मातेरे,९५ हजार ७०१ बी.के. खोसे,प्रेरणा शाळा ते ६६ लाख बहिरट, बी.के. खोसे,चिंतामणी रस्ता २० हजार १७७ टी़ जी़ धमानीरावेत वाल्हेकरवाडी १५ कोटी ६५ लाख कृष्णाई, अजवानी,३४ मीटर रस्ता ५६ हजार ३०१ व्ही़ एम़ मातेरेब प्रभाग कार्यालय २१ कोटी ३६ लाख बी.के. खोसे,सुधारणा १७ हजार १६३ एसएस साठे, नोबेल
सत्ताधारी, प्रशासनाच्या अळीमिळीने ठेकेदार करताहेत जनतेच्या पैशांची लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 2:12 AM