पिंपरी : सावकारी करतो तसेच जास्त दराने व्याज घेतो, अशी तक्रार निबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. या विषयी चौकशी करण्यासाठी तसेच सावकारी करणाऱ्याच्या घराची झडती घेण्यासाठी निबंधक कार्यालयातील कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी गेले असता त्यांची अडवणूक करून एका रुम लॉक लावून झडती घेऊन न देता शासकीय कामात अडथळा आणला. ही घटना शुक्रवारी (दि.१७) घडली. या प्रकरणी सहकार अधिकारी नुतन श्रीकांत भोसले (वय ५३) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तनिष मनिष कासलीवाल (रा. बाणेर) यांच्या सह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनिबंधक कार्यालयाकडे सावकारी विषयी तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार फिर्यादी व त्यांचे वरिष्ठ अधिकारी, इतर कर्मचारी तसेच पोलीस स्टाप असे मिळून मनिष राजमल कासलीवाल यांच्या राहत्या घराची झडती घेण्यासाठी गेले. त्यावेळी मनिष यांची मुलगी, मुलगा आरोपी तनिष आणि एका महिलेने घराचे गेट न उघडता झडती घेण्यासाठी आलेल्या पथकाला घरात घेतले नाही. पथकातील कर्मचाऱ्यांनी विनंती केल्यानंतर त्यांना घरात घेतले. मात्र, ते करत असलेल्या कामात आरोपींनी अडथळा निर्माण केला. तसेच प्लॅटमधील एका रुमममध्ये दरवाजा बंद करून त्या रुमची झडती घेण्यापासून संबंधित पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना रोखले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.