शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

ढोल-ताशा पथकातील प्रेमप्रकरण पडले महागात; लग्नाचे आमिष दाखवून केला तरुणीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 12:36 PM

अज्ञात व्यक्तीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल, तो विवाहित असल्याची बाबही ठेवली लपून

ठळक मुद्देनिगडी येथील एका ढोल-ताशा पथकात वादनाच्या सरावासाठी जात होती. पथकात ओळखीनंतर झाले प्रेम प्रकरण

पिंपरी: ढोल-ताशा पथकात झालेल्या प्रेमप्रकरणातून लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रावेत तसेच राजगुरुनगर परिसरात जुलै २०१७ ते २१ मार्च २०२१ या कालावधीत ही घटना घडली आहे.   

२९ वर्षीय तरुणीने याप्रकरणी मंगळवारी फिर्याद दिली आहे. संदीप मनोहर शिंदे (वय ३७, रा. राजे शिवाजी नगर,) असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप शिंदे हा विवाहित असून ही बाब त्याने लपवून ठेवली. लग्न झाले असल्याचे तरुणीला सांगितले नाही. तरुणी नोकरी करीत असून, निगडी येथील एका ढोल-ताशा पथकात वादनाच्या सरावासाठी जात होती. त्यावेळी शिंदे व तिची ओळख झाली. तू मला खूप आवडते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्यासोबत मैत्री करण्यास तयार आहे. तुझी इच्छा आहे का? असे विचारून तिचा विश्वास संपादन केला.

तरुणीने मैत्रीस होकार दिला. मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे आमिष दाखवून तरुणीला जबरदस्तीने त्याच्या चारचाकी वाहनातून रावेत परिसरातील हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन गेला. त्यानंतर मुकाई चौक ते भोंडवे चौक दरम्यान अंधारात त्याची चारचाकी थांबवली. त्यावेळी शिंदे याने तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर खेड तालुक्यातील राजगुरुनगर परिसरात एका फार्म हाऊसवर वारंवार घेऊन गेला. तेथे तिच्या कपाळावर कुंकू लावला. तू माझी बायको आहेस, असे सांगून वेळोवेळी नैसर्गिक व अनैसर्गिक संबंध ठेवून फिर्यादी महिलेवर अत्याचार केला. 

याप्रकरणी तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन तो गुन्हा देहूरोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक विशाल जाधव तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला