पिंपरी : विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. निवडणूक आयोगाने मतदार जाहीर केले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्यावेळी २०१९ ला १३ लाख ६३ हजार ५६१ मतदार होते. तर आजअखेर १६ लाख ४३ हजार ८२२ मतदार नोंद आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये ३ लाख ७९ हजार २६१ मतदारांची भर पडली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे मतदारांत भर पडली आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी आहे. शहरामध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तीन पूर्ण आणि मावळ आणि मुळशीचा काही भाग आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारसंघांमध्ये निरंतर मतदार नोंदणी अभियान राबविले जाते. त्यास प्रतिसाद मिळाला आहे.
दीड महिन्यात ८६५४ मतदारांची नोंद
निवडणूक आयोगाच्या वतीने ३० ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी आणि आजअखेरपर्यंत मतदार नोंदणी करण्यात आली. दीड महिन्यात वाढ झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये ४३९७ तर पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये ८६१, भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये ३३९६ नवमतदार, मावळ मतदारसंघांमध्ये ३१८६ नवीन मतदारांची नोंद आहे. दीड महिन्यामध्ये तीन विधानसभा ८६५४ मतदारसंघांमध्ये मतदारांची भर पडली आहे.
शहरीकरण, नागरिकीकरणामुळे मतदार वाढले
पिंपरी चिंचवड औद्योगिकनगरी आहे. तसेच या भागात मोठ्या प्रमाणावर नोकरी आणि व्यवसायासाठी देश आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक वास्तव्यास आलेले आहेत. तसेच नवीन उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण संस्था निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे लोकसंख्या आणि मतदारवाढीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. तसेच तळेगाव आणि चाकण, हिंजवडी औद्योगिक परिसर शहरालगत आहे, दळणवळणाची साधने उपलब्ध आहेत. त्यामुळेही मतदारसंख्या वाढली आहे.