पुणे : अारक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने राज्यभरात ठिकठिकाणी अांदाेलने सुरु अाहेत. आज मराठा क्रांती माेर्चाच्याकडून मावळ बंद ठेवण्यात आला होता. आज (दि.२६)दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुणे - मुंबई एक्सप्रेस हायवे काही काळ बंद करुन आंदोलकांनी निषेध व्यक्त केला.यावेळी घोषणाबाजी करुन सरकारचा निषेध करण्यात अाला.
पवनमावळ परिसरातील हजारो मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले हाेते. त्यांनी बौर पोलीस चौकी जवळ काही काळ रस्ता बंद केला. पोलिसाच्या सतर्कतेमुळे आंदोलकांचे निवेदन स्वाकारुन एक्स्प्रेस हायवे पुन्हा चालू केला आहे. यावेळी पाेलिसांचा माेठा फाैजफाटा तैनात करण्यात अाला हाेता. काल मुंबईमध्ये झालेला हिंसाचार लक्षात घेता कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पाेलिसांकडून घेण्यात येत हाेती. भगवे झेंडे घेऊन शेकडाे अांदाेलक एक्सप्रेसवर उतरले हाेते. सध्या एक्सप्रेस वे पूर्ववत करण्यात अाला अाहे.