पिंपरी : सहयोगी आमदार महेश लांडगे यांना भाजपानेभोसरी मतदारसंघातून उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस आघाडीने थेट पक्षाचा उमेदवार न देता अपक्ष उभे राहिलेल्या माजी आमदार विलास लांडे यांना पुरस्कृत केले. विद्यमान व माजी आमदार यांच्यामध्ये ही दुरंगी लढत होत आहे. भाजपाकडून विकासाचा दावा, अपक्ष उमेदवाराकडून पोलखोल करून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. भोसरी हा ऐकेकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कुणाला तिकीट देणार याकडेसर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र शेवटपर्यंत उमेदवार निश्चित न झाल्याने राष्ट्रवादीने विलास लांडे यांना पुरस्कृत केले. भाजपाचे सर्वच नगरसेवक व पदाधिकाºयांनी राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्याने अगोदरच प्रचारात आघाडी घेतली होती. सोशल मीडिया, पदयात्रा व सभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे. लांडगे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रॅली मतदारसंघात पार पडली. मात्र अपक्ष उमेदवार असलेले लांडे यांना कार्यकर्त्यांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने लांडे यांना पुरस्कृत केले असले, तरी राष्ट्रवादीच्या कोणत्याही दिग्गज नेत्यांनी जाहीर सभा अद्याप झालेली नाही. .........
मित्र पक्षाकडून दुजाभाव विद्यमान आमदार लांडगे हे पाच वर्षांत केलेल्या विकासाच्या मुद्यावर प्रचार करत असले, तरी असा काही विकास झालाच नाही, असा दावा करीत माजी आमदार लांडे कुरघोडी करत आहेत. दोघांमधील लढत प्रतिष्ठेची झाली असली तरी दोघांनाही स्वत:च्या मित्रपक्षाकडूनच धोका असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीने लांडे यांना पुरस्कृत केले असले तरी राष्ट्रवादी व कॉँग्रेसचे कार्यकर्ते थेट सक्रीय असल्याचे दिसत नाहीत. तसेच, भोसरी मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. मात्र ऐनवेळी भाजपाच्या उमेदवाराला तिकीट दिल्याने शिवसेनेमध्ये काही प्रमाणात नाराजीची भावना आहे. शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही भाजपा उमेदवारावाला पाठिंबा देणार असे बोलत असले तरी त्यांच्यातील नाराजी लपून राहिली नाही. त्यामुळे दोघाही आजी-माजी आमदारांना आघाडी व महायुतीकडून पूर्ण पाठिंबा मिळत नसल्याची चर्चा आहे. .................
मित्र पक्षाकडून दुजाभाव विद्यमान आमदार लांडगे हे पाच वर्षांत केलेल्या विकासाच्या मुद्यावर प्रचार करत असले, तरी असा काही विकास झालाच नाही, असा दावा करीत माजी आमदार लांडे कुरघोडी करत आहेत. दोघांमधील लढत प्रतिष्ठेची झाली असली तरी दोघांनाही स्वत:च्या मित्रपक्षाकडूनच धोका असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीने लांडे यांना पुरस्कृत केले असले तरी राष्ट्रवादी व कॉँग्रेसचे कार्यकर्ते थेट सक्रीय असल्याचे दिसत नाहीत. तसेच, भोसरी मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. मात्र ऐनवेळी भाजपाच्या उमेदवाराला तिकीट दिल्याने शिवसेनेमध्ये काही प्रमाणात नाराजीची भावना आहे. शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही भाजपा उमेदवारावाला पाठिंबा देणार असे बोलत असले तरी त्यांच्यातील नाराजी लपून राहिली नाही. त्यामुळे दोघाही आजी-माजी आमदारांना आघाडी व महायुतीकडून पूर्ण पाठिंबा मिळत नसल्याची चर्चा आहे. ..........................
इतर उमेदवारांचा फटका कोणाला तर उमेदवारांचा फटका कोणाला बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र पवार, वंचित बहुजन आघाडीचे शाहनवाज शेख, समाजवादी पार्टीचे वहिदा शेख, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे ज्ञानेश्वर बोराटे,जनहित लोकशाही पार्टीचे विश्वास गजरमल, महाराष्ट्र मजदूर पार्टीचे भाऊसाहेब अढागळे, बहुजन मुक्ती पार्टीचे विजय आराख हे ही रिंगणात आहेत. त्यांचाही आपआपल्या परीने प्रचार सुरू असून, बैठका व कोपरा सभा घेतल्या जात आहेत. इतर प्रमुख पक्षातील उमेदवाराचा कोणाला फटका बसणार याची उत्सुकता आहे.