पिंपरी : विनापरवाना पदयात्रेचे आयोजन केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचेपिंपरी मतदारसंघातील उमेदवारासह एका माजी नगरसेवक अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड येथील लिंकरोड ते पिंपरीतील रमाबाई नगर झोपडपट्टी दरम्यान गुरुवारी (दि. १७) पदयात्रा काढण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी आमदार अण्णा दादू बनसोडे (वय ५०, रा. मोहननगर, चिंचवड) तसेच माजी नगरसेवक जगन्नाथ दगडू साबळे (वय ४०, रा. लिंकरोड, पिंपरी) यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार राजू शिवाजी पांढरे (वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठीराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिंपरी मतदासंघातून माजी आमदार अण्णा बनसोडे निवडणूक लढवित आहेत. गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अण्णा बनसोडे व माजी नगरसेवक जगन्नाथ साबळे यांनी पदयात्रेचे आयोजन केले होते. चिंचवड येथील लिंकरोड ते पिंपरी येथील रमाबाई नगर झोपडपट्टी दरम्यान ही पदयात्रा विनापरवाना काढण्यात आली. त्यामुळे बनसोडे व साबळे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
Maharashtra Election 2019 : पिंपरीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 4:13 PM
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिंपरी मतदासंघातून माजी आमदार अण्णा बनसोडे निवडणूक लढवित आहेत.
ठळक मुद्देअण्णा बनसोडे व माजी नगरसेवक जगन्नाथ साबळे यांनी केले होते पदयात्रेचे आयोजन