पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी मतदारसंघातील उमेदवार बदलला आहे. नगरसेविका सुलक्षणा शिलवंत - धर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी नाराजी व्यक्त करून बंडखोरी करीत अपक्ष लढण्याचा इशारा दिला होता. अखेर पक्षाने निर्णय बदलत शिलवंत-धर यांच्याऐवजी बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केली.पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. तसेच या मतदारसंघात इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षात बंडखोरी होत असल्याचे दिसून येत आहे. महायुतीतर्फे शिवसेनेने विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी दिली. तर आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसने नगरसेविका सुलक्षणा शिलवंत - धर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील इच्छुक असलेले माजी आमदार बनसोडे व शेखर ओव्हाळ यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच बंडखोरी करून अपक्ष लढण्याचा इशारा दिला. त्यामुळे पक्षात खलबते झाली आणि उमेदवार बदलण्यात आला. राष्ट्रवादीच्या ह्यएबीह्ण फॉर्मसह बनसोडे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
Maharashtra election 2019 : पिंपरीत राष्ट्रवादीने ऐनवेळी बदलला उमेदवार; माजी आमदार अण्णा बनसोडे यांचा अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 12:05 PM
नगरसेविका सुलक्षणा शिलवंत - धर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने बनसोडे यांनी अपक्ष लढण्याचा दिला होता इशारा..
ठळक मुद्देमहायुतीतर्फे शिवसेनेने विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी