पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. शहरात गुन्हेगारी वाढली असून, महिला व मुली सुरक्षित नाहीत. पोलीस आयुक्तालय होऊनही गुन्हेगारी कमी झाली नाही. गुन्हेगारी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहुल कलाटे यांना पुरस्कृत म्हणून पाठिंबा दिला आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मांडली. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून सर्वांगिण विकासासाठी राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे कलाटे यांना राष्टÑवादी काँग्रेसने पुरस्कृत केल्याची भूमिका पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल, रंगनाथ फुगे, वैशाली घोडेकर, कविचंद भाट, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने,अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, प्रवक्ते फजल शेख उपस्थित होते.राष्ट्रवादीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मात्र, भाजपाने शहराची वाट लावून टाकली आहे़ पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत गाफील न राहता प्रभागवार प्रचारयंत्रणा राबवावी. भाजपाने केलेली चुकीची कामे लोकांसमोर मांडावीत, असे आवाहन पवार यांनी केले. ..........आयटी पार्कची कोंडी सोडविणार : राहुल कलाटे चिंचवडचा मतदार हा सुज्ञ आहे. विकास कोणी केला. कोणाच्या नेतृत्वाखाली झाला. ही येथील जनता जाणून आहे. संधीसाधूपणाचे राजकारण करणाऱ्यांची गय करणार नाही. चिंचवडचा विकास करण्यास प्राधान्य देणार असून, शंभर टक्के शास्तीकर माफी, अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी सुटसुटीत नियमावली, उपनगरातील कचरा समस्या, नदीसुधार, आयटीयन्सला चोवीस तास पाणी, हिंजवडी आयटी पार्कची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल, हिंजवडी ते चाकण मेट्रोसाठी पाठपुरावा करणार आहे, असे आश्वासन राहुल कलाटे यांनी दिले.
Maharashtra Election 2019 : गुन्हेगारी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादीचा राहुल कलाटे यांना पाठिंबा : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 2:48 PM
संधीसाधूपणाचे राजकारण करणाऱ्यांची गय करणार नाही...
ठळक मुद्देभाजपाने केलेली चुकीची कामे लोकांसमोर मांडा