वडगाव मावळ : पुणे जिल्हा बॅकेचे संचालक, तसेच पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्यासह हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून मंगळवारी ( दि. १५ ऑक्टो.) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मावळ विधासभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाळासाहेब नेवाळे हे तीव्र इच्छुक होते. परंतु त्यांना उमेदवारी नाकारून भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सुनील शेळके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे नेवाळे हे नाराज होते. दोनच दिवसापूर्वी त्यांनी जिल्हा बॅक व जिल्हा दूध संघाचा संचालक पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घ्यायची घोषणा केली. त्या पाठोपाठ त्यांचे भाचे पंचायत समितीचे सदस्य दतात्रय शेवाळे यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेनंतर नेवाळे यांनी राजकारणातून निवृत्ती घेऊ नये इतर कोणत्याही पक्षात जावे यासाठी ग्रामीण भागातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या गोवित्री गावातील घरासमोर ठिय्या आंदोलन केले. यानंतर त्यांनी राजकारणातील निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.
ऐन निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका... बाळासाहेब नेवाळे, पंचायत समिती सदस्य दतात्रय शेवाळे यांच्यासह हजारो कार्यकर्ते तळेगाव येथील भाजपच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. ऐन निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसणार आहे. याबाबत बाळासाहेब नेवाळे यांना विचारले असतात आज काहीतरी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.आणि तो निर्णय संध्याकाळी दिसेलच.