पिंपरी : विधानसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया सॊमवारी सुरू झाली असून सकाळी सात वाजल्यापासून पिंपरी, चिंचवड मावळ आणि भोसरी मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी सात ते नऊ या वेळात चिंचवडमध्ये 6.6 , भोसरीत 5.11, पिंपरीत टक्के मतदान झाले आहे. पाऊस असताना असतानाही मतदानाची टक्केवारी चांगली असल्याचे दिसून येत आहे.विधानसभा निवडणुकीतील अंतिम टप्पा मतदान होत असून चिंचवडमधील 439, भोसरीतील 411, पिंपरीतील 399 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण असल्याने मतदानाची टक्केवारी कमी होती की काय असे चिन्ह होते. मात्र, पहिल्या टप्प्यामध्ये हे चांगले मतदान झाले आहे. चिंचवड मतदार संघातील वाकड परीसरातील गुड सॅम रिटर्न शाळेचे मतदान केंद्र वगळता बहुतेक मतदान केंद्रावर तुरळक गर्दी दिसली. भूमकर वस्ती शाळेत सकाळी साडे नऊपर्यंत रांगा लावून मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला मात्र नंतर ही गर्दी ओसरली. वाकड पिंक सिटी रस्त्यावरील इंफ्रंट जिजस शाळेत खोली क्रमांक ४ मधील ईव्ही पॅड मशीन बंद पडले होते पोलिंग एजंटनी हरकत घेतल्याने दुसरे मशीन जोडण्यात आले. बहुतेक आयटी कंपन्यांना दुपार नंतर सुट्टी असल्याने आयटी मतदारांची सध्या तरी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
पिंपरी मतदारसंघ मतदान टक्केवारी पुरूष एकूण मतदार - १८५९३९महिला एकूण मतदार - १६७६००तृतीयपंथी एकूण मतदार - ६एकूण मतदार - ३५३५४५
झालेले मतदान पहिला टप्पा - ७ ते ९पुरूष मतदार - ९०६१महिला मतदार - ४९१०तृतीयपंथी मतदार - ---एकूण मतदान - १३९७१मतदान टक्केवारी - ४.०१
झालेले मतदान दुसरा टप्पा - ९ ते ११पुरूष मतदार - २५८८७महिला मतदार - १५८८४तृतीयपंथी मतदार - ०३एकूण मतदान - ४१३७४मतदान टक्केवारी - ११.७०
भोसरी मतदारसंघ मतदान टक्केवारी पुरूष एकूण मतदार - २,४१,५९७महिला एकूण मतदार - १,९९,४९७तृतीयपंथी एकूण मतदार - ११एकूण मतदार - ४,४१,१२५
झालेले मतदान पहिला टप्पा - ७ ते ९पुरूष मतदार - १५,२१८महिला मतदार - ७,३१०तृतीयपंथी मतदार - ००एकूण मतदान - २२,५२८मतदान टक्केवारी - ५.११
झालेले मतदान दुसरा टप्पा - ९ ते ११पुरूष मतदार - ४२,४५६महिला मतदार - २४,२०३तृतीयपंथी मतदार - ०१एकूण मतदान - ६६,६६०मतदान टक्केवारी - १५.११
मावळ तालुक्यात सकाळच्या सत्रात 18.83 टक्के मतदान
लोणावळा : अतिशय चुरशीची व अटितटीची लढत असलेल्या मावळ तालुक्यात सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यत 18.83 टक्के मतदान झाले. मावळ तालुक्यात 3 लाख 48 हजार 462 मतदार आहेत यापैकी 65 हजार 631 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गावोगावी उत्सपुर्तपणे मतदार मतदानाकरिता घराबाहेर पडत आहेत. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने आज चांगली उघडीप दिल्याने मतदानांचा टक्का वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मावळ तालुक्यातील 370 मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, आरपीआय या महायुतीचे उमेदवार व राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी भेगडे आळीतील कैकाडीवाडा समाज मंदिरातील केंद्रावर सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला
भोसरी मतदारसंघातील सात व्हीव्हीपॅट मशीन बदलल्यापिंपरी : मतदान सुरू असतनाना झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे भोसरी मतदारसंघातील सात ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्या. मशीनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे काही वेळ मतदान केंद्रावर खोळंबा झाला. पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा क्रमांक २२ चºहोली, सु.ना..बारसे विद्यालय दिघी रोड भोसरी, मंजुरी शाळा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आदर्शनगर दिघी, पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा म्हेत्रेवस्ती, पिंपरी-चिंचवड मुला-मुलींची शाळा ८९ कुदळवाडी, पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा ९८ तळवडे गावठाण, सिद्धेश्वर हायस्कूल इंग्लिश मिडीयम स्कूल दिघी रोड भोसरी या सात मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. काही वेळाने हे मशीन बदलून मतदानाला सुरळीत सुरूवात झाली.