पिंपरी : विधानसभेची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप झाल्यानंतर, प्रचारसाहित्य तयारीला वेग आला आहे. दारोदार फिरून जनमत आपल्या बाजूने करण्यासाठी उमेदवारांना अवघे दहा दिवस आहेत. अशा स्थितीमध्ये रात्रीचा दिवस करून, उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचताना दमछाक होत आहे. शहरामध्ये तीन मतदारसंघ आहेत; तसेच मावळ हा ग्रामीण मतदारसंघही आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये निवडणूक आयोगाचे दोन-दोन निवडणूक निरीक्षक सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. याशिवाय प्रचार यंत्रणेवरील खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र निरीक्षक आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारावरही बºयाच मर्यादा आहेत. आयोगाने दिलेल्या २८ लाख रुपये खर्चाच्या मर्यादेत राहून प्रचार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या वेळी बहुतांश पक्षांच्या उमेदवारांना तिकीट आपल्याला मिळेल की नाही, याची शाश्वती नव्हती. त्यामुळे बरेच उमेदवार पक्षश्रेष्ठींना साकडे घालण्यासाठी राजधानीचे दौरे करण्यात व्यस्त होते. त्यामुळे मतदारसंघाचा संपर्क बऱ्यापैकी तुटला होता. तिकीट मिळाल्यानंतरही अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या. अशा स्थितीत कमी वेळेमध्ये मतदारापर्यंत पोहोचणे हे उमेदवारांपुढे आव्हान आहे. निवडणुकीसाठी १० दिवस शिल्लक आहेत. १९ आॅक्टोबर ही प्रचाराची शेवटची तारीख आहे. तत्पूर्वीच उमेदवाराला प्रत्येक वॉर्डातील मतदारापर्यंत पोहोचायचे ..............उमेदवार पिंजून काढताहेत गावेमावळात २२० गावे आहेत. प्रचारासाठी थोडा कालावधी असल्याने मावळातील उमेदवारांनी गावभेटीवर धडाका लावला आहे. सभा, बैठकांचे आयोजन केले जात आहे. ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर उमेदवारांच्या बैठका होत आहेत. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी झाडून कामाला लागले आहेत. प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने एकाच दिवशी दहा-पंधरा गावे पिंजून काढली जात आहेत. नगरसेवकांची धावपळशहरातील तीन मतदारसंघांमध्ये ३२ प्रभाग आहेत. या प्रभागातील नगरसेवक कंबर कसून निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरले आहेत. सोसायट्यांमध्ये सभा घेणे, महिला संघांच्या भेटी घेणे यासाठी नगरसेवक प्लॅनिंग करत आहेत. मात्र प्रचारासाठी थोडे दिवस बाकी असताना प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवारांचा दौरा आयोजित करताना नगरसेवकांची पळापळ होत आहे.
Maharashtra Election 2019 : पिंपरीत निवडणुकीच्या प्रचारासाठी ‘रात्र थोडी, सोंगे फार’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 3:23 PM
दारोदार फिरून जनमत आपल्या बाजूने करण्यासाठी उमेदवारांना अवघे दहा दिवस आहेत.
ठळक मुद्देआयोगाने दिलेल्या २८ लाख रुपये खर्चाच्या मर्यादेत राहून प्रचार करताना तारेवरची कसरत उमेदवार पिंजून काढताहेत गावे