शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

भारताच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा वाटा १ ट्रिलीयन डॉलर असेल : अजित पवार

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: August 25, 2023 4:19 PM

उपमुख्यमंत्री पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर ...

पिंपरी : मला पहिल्यापासून कुठल्याही विकास कामात लक्ष घालायला आवडत. ती माझी पॅशन आहे. तळेगावमधील जनरल मोटर्सचा उद्योग बंद पडला आहे. त्याठिकाणी ह्युंदाईचा प्रकल्प कसा येईल हे पाहिले पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यातील धरणांचा नव्याने विचार करावा लागणार आहे. या धरणांमधून वीज निर्मिती कशी सुरु करावी? यावर विचार करावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था टॉप पाचमध्ये आली आहे. आता टॉप तीनमध्ये आणण्याचे उद्दिष्ट आहे, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. अजित पवार शुक्र‌वारी (दि.२५) पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होेते.

पवार म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी आढावा घेतला जात आहे. पवना बंद जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लावणार आहे. तसेच पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचेही लवकरच मार्गी लावणार आहे.  पिंपरी-चिंचवड शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मार्ग काढला जाणार आहे. स्मार्ट सिटी अभियानावरही चर्चा केली जाणार आहे. शहराचे वाढते विस्तारीकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी बोलणार आहे. त्या नवीन भागाला सर्व पायाभूत सुविधा आणि पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मुळशी, मावळातील टाटा धरणाचे तसेच डोंगरावरून कोकणात वाहून जाणारे पाणी साठवून त्याचा उपयोग शहरासाठी कसे करता येईल, याचा विचार करण्यात येणार आहे, असेही अजित पवार म्हणाले. 

सायन्स सिटी पुण्यातच... सायन्स सिटी हा पिंपरी-चिंचवड शहरातच होईल, असे काही नव्हते. तो कोण्या एका शहराचा प्रकल्प नाही. त्यात केंद्र शासनाचा वाटा मोठा आहे. त्यामुळे तो प्रकल्प केंद्र सरकार सांगेल तिथेच होणार आहे. त्या प्रकल्पासाठी कमीत कमी ३० एकर जागा अपेक्षित आहे. तशी जागा पुण्यात मुंढवा येथे आहे. त्या जागेचा विचार सुरू आहे. त्यामुळे तो प्रकल्प पुण्यातच होण्याची शक्यता असल्याचे पवारांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेस