शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

...अन् गांधीजी अवतरले चिंचवड रेल्वेस्थानकावर! 'चले जाव' च्या आठवणींना मिळाला उजाळा

By विश्वास मोरे | Published: August 09, 2024 5:05 PM

गांधीजींना ९ ऑगस्ट १९४२ ला पुण्यातील येरवडा कारागृहात आणले जात होते. परंतु जनक्षोभ उसळू नये, म्हणून चिंचवड रेल्वेस्थानकावर उतरले होते

पिंपरी : स्वातंत्र्यलढ्यात ऑगस्ट क्रांतिदिनास महत्व आहे. शुक्रवारी आज दुपारी मुंबईहून येणार्‍या रेल्वेतून ब्रिटिश अधिकार्‍यासमवेत चिंचवड रेल्वेस्थानकावर चक्क महात्मा गांधीजी उतरले अन् त्यांच्या जयघोषाच्या जल्लोषाने प्रवासीही चकित झाले. ९ ऑगस्ट १९४२ ला चिंचवड स्थानकावर महात्मा गांधी काही काळ थांबले होते. या घटनेचा पुनर्प्रत्येय आला. आठवणींना उजाळा मिळाला. 

महात्मा गांधी यांनी 'चले जाव' आंदोलन पुकारल्यामुळे त्यांना अटक झाली.  दिनांक ९ ऑगस्ट १९४२ ला पुण्यातील येरवडा कारागृहात आणले जात होते. परंतु जनक्षोभ उसळू नये, म्हणून चिंचवड रेल्वेस्थानकावर त्यांना उतरले होते. या घटनेची आठवण शब्दधन काव्यमंचाने या प्रसंगाचे अभिरूपदर्शन घडवून आणले. तसेच रेल्वेस्थानकावर महात्मा गांधी विचारजागर या ऐतिहासिक कविसंमेलन घेण्यात आले.  ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पी. एस. आगरवाल महात्मा गांधींच्या आणि सुभाष चव्हाण इंग्रज अधिकार्‍याच्या वेशभूषेत सहभागी झाले होते; तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहसंयोजक प्रकाश क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, उपाध्यक्ष मुकेश चुडासामा, चिंचवड रेल्वेस्थानक प्रबंधक मॅथ्यू जॉर्ज, ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, अशोकमहाराज गोरे, राजेंद्र घावटे, कैलास भैरट, प्रकाश घोरपडे, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती.

बालकवयित्री सानिका जोशीपासून ते ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे यांच्यापर्यंत सुमारे तीस कवींनी आपल्या देशभक्तिपर रचनांनी वीरश्रीपूर्ण वातावरणनिर्मिती केली होती. यामध्ये शोभा जोशी, अरुण कांबळे, सीमा गांधी, बाळकृष्ण अमृतकर, शामला पंडित, आय. के. शेख, अण्णा जोगदंड, अण्णा गुरव, योगिता कोठेकर, शामराव सरकाळे, आत्माराम हारे, रशिद अत्तार, जयवंत पवार यांच्या रचना उल्लेखनीय होत्या. कविवर्य रघुनाथ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ केला. उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे देशभक्तिपर घोषणा दिल्या. नामदेव हुले, आनंद मुळूक, राजू जाधव, फुलवती जगताप, शरद काणेकर, राजेंद्र पगारे, सुंदर मिसळे, काळुराम सांडगे यांनी संयोजन केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी एकोंडे यांनी आभार मानले. वंदेमातरमने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधीagitationआंदोलनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडrailwayरेल्वेIndependence Dayस्वातंत्र्य दिन