खडकी : येथील खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर शाळेसमोर महावितरण विभागाकडून उघड्यावरच उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीची केबल टाकली होती. अनेक वर्षे ही केबल रस्त्यावर उघड्यावरच होती. शाळा प्रशासनाकडून वारंवार तक्रार करूनही महावितरणने त्याची दखल घेतली नव्हती. याचा धोका लक्षात घेऊन लोकमतने ‘ विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ’ अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली. या बातमीची दखल घेऊन महावितरणने त्वरित शाळेच्या समोरील उघडी केबल काढून टाकली. त्यामुळे शाळेतील शिक्षक कर्मचारी व पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अनेक वेळा तक्रार करूनही महावितरण ने दखल घेतली नव्हती. लोकमतने बातमी छापून वाचा फोडली. त्यामुळे महावितरणला जाग आली. केबल काढल्यामुळे आता विद्यार्थी आणि पालक निर्धास्त झाले आहेत. त्यामुळे ‘लोकमत’चे मनापासून आभार, असे माजी मंत्री चंद्रकांत छाजेड म्हणाले. (वार्ताहर)
महावितरणला आली जाग
By admin | Published: October 12, 2016 1:51 AM