शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

महावितरणनेच थकवली थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:19 AM

कारवाईकडे प्रशासनाचा काणाडोळा

देहूरोड : देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाने देहूरोड येथे महावितरणच्या शाखा कार्यालयासाठी दिलेल्या दोन गाळ्यांचे भाडे साडेचार वर्षांपासून थकविले असून, अखेर थकबाकी दोन लाख ३ हजार ९५६ रुपयांवर पोहोचली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. बोर्डाकडून महावितरणवर मात्र कोणतीही कारवाई करण्यात चालढकल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.कॅन्टोन्मेंट बोर्डाने देहूरोड पोलीस ठाण्याजवळ (सेंट्रल रेस्टॉरंटशेजारी) असलेल्या बोर्डाच्या मालकीच्या एलआयजी मार्केटमधील क्रमांक पाच व दहा असे दोन गाळे १९७० पासून जुन्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळास भाड्याने दिलेले आहेत. या गाळ्यांना कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून ४११ रुपये भाडे आकारण्यात येत होते. ३१ मार्च २०१२ पर्यंत भाड्यापोटी २० हजार ६५० रुपये थकबाकी होती . त्यानंतर एप्रिल ते डिसेंबर २०१२ अखेर दरमहा बोर्डाकडून ४११ रुपये भाडे आकारण्यात येत होते. मात्र, त्यानंतर बोर्डाने मंजूर केलेल्या एका ठरावानुसार भाडेवाढ केल्यानंतर दरमहा २ हजार ८७७ भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे.बैठका झाल्या, पण निर्णय नाहीच!दरम्यान, महावितरण कंपनीने ११ आॅक्टोबर २०१३ रोजी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे एकूण १० हजार २७५ रुपये जमा केल्याचे दिसत आहे. त्यानंतर भाड्याची उर्वरित रक्कम न भरल्याने जून २०१८ अखेर एकूण थकबाकी दोन लाख तीन हजार ९५६ रुपये झाली असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे . बोर्डाच्या महसूल विभागाने महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत गतवर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या एका बैठकीत सर्व थकबाकीचा पाढाच वाचून दाखवत महावितरण कंपनी वीज बिल न भरल्यास दुसºया दिवशी दंडासह रक्कम वसूल करते याची आठवण करून दिली होती.

टॅग्स :mahavitaranमहावितरणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड