पुणे : अद्वितीय सुरांच्या सादरीकरणातून असंख्य रसिकांच्या पसंतीस उतरलेले एक नाव म्हणजे महेश काळे. त्याची स्वरमैफल ही जणू रसिकांसाठी सुश्राव्य पर्वणीच ठरते. त्याच्या जादुई कंठस्वरांची ‘याचि देही याचि डोळा’ अनुभूती घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि फिनोलेक्स पाईप्स यांच्या सहयोगाने बुधवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाचला चिंचवड येथील शिवाजी उदय मित्र मंडळ मैदानात आयोजित या स्वराविष्कारांनी रसिकांची दिवाळी पहाट ‘स्वरचैतन्य’मयी होणार आहे.गेल्या पाच वर्षांपासून लोकमत ‘दिवाळी पहाट’ हा उपक्रम राबवीत आहे. या उपक्रमाची रसिक आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा महेश काळे यांच्या सुरांनी रसिकांचा पाडवा गोड होणार आहे. महेश काळे हा तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याच्या मैफलीला युवा पिढी हमखास गर्दी करते हे आजवरचे चित्र आहे. लोकमतचा ‘स्वरचैतन्य’ आविष्कारही त्याला अपवाद ठरणार नाही. या कार्यक्रमात महेश काळे यांच्यासमवेत वैभव खानोलकर, ओंकार दळवी, सूर्यकांत सुर्वे आणि राजीव तांबे हे सहभागी होणार आहेत. महेश काळे या कार्यक्रमात शास्त्रीय, नाट्यसंगीताची सुरेल मेजवानी देणार आहेत. कार्यक्रमाला भोसरीच्या राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज, काका हलवाई स्वीट सेंटर, बेव्हरेज ऊर्जा, रेडियो सिटी, धीरेंद्र आऊटडोअर मीडिया सोल्युशन्स यांचे सहयोगी प्रायोजकत्व लाभले आहे.‘स्वरचैतन्य’ कार्यक्रमाच्या विनामूल्यप्रवेशिका दि. ३ नोव्हेंबरपासूनराणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज, भोसरीकाका हलवाई स्वीट सेंटर, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहासमोर, चिंचवडलोकमत पिंपरी विभागीय कार्यालय, विशाल ई-स्क्वेअर बिल्डिंग, पिंपरीपं. सुधाकर चव्हाण, सर्व्हे नं. १४/१/६, शितोळेनगर, मधुबन सोसायटी चिंचवड येथे उपलब्ध होणार आहेत.संपर्क : ९८५०४०३२०५कार्यक्रम स्थळशिवाजी उदय मित्र मंडळ मैदान, चिंचवडदिनांक : बुधवार, ७ नोव्हेंबरवेळ : पहाटे ५.३० वाजताप्रवेश सर्वांसाठी विनामूल्य खुला प्रवेशिका आवश्यक
महेश काळेच्या सुरांची रसिकांना मिळणार मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 2:31 AM