पिंपरी : पुणे महापालिकेत कामानिमित्त अथवा, पदाधिकारी, अधिका-यांच्या भेटीस येणा-या नागरिकांना प्रवेशपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिकारी, पदाधिका-यांना भेटण्याची विशिष्ट वेळ निश्चित केली असून, प्रवेश पत्राशिवाय महापालिकेत सोडले जात नाही. याउलट पिंपरी-चिंचवड महापालिकेत कर्मचाºयांच्या बेशिस्तीचा कारभार सुरू असल्याचे दिसून येते.महापालिकेत दोन वर्षांपूर्वी अधिकाºयांना गणवेश वापरणे तसेच ओळखपत्र लावणे सक्तीचे केले होते. सुरुवातीचे काही दिवस अधिकारी गणवेशात दिसले. नंतर महत्त्वाच्या सभांच्या वेळी अधिकारी गणवेशात दिसायचे. काही काळ उलटल्यानंतर पुन्हा अधिकारी वर्गाचा मनमानी कारभार सुरू झाला आहे. अधिकारी कोण? नागरिक कोण? हे समजणे कठीण झाले आहे. सायंकाळी सहानंतर कोणालाही पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रवेश दिला जाणार नाही, असा आदेश काढल्यानंतरही सायंकाळी उशिरा महापालिकेत जाणारे अनेक आहेत. त्यांना हटकण्याचे धाडस कोणताच सुरक्षा अधिकारी दाखवत नाही.महापालिकेतील काही अधिकारी प्रकल्प भेटीस गेल्याचे सांगितले जाते. मात्र त्यातील काही अधिकारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत घरची कामे करतात. काही जण मुलांना शाळेत सोडणे, शाळेतून घरी सोडणे अशा कामात व्यस्त दिसून येतात. झेरॉक्ससाठी कार्यालयाबाहेर पडलेले कर्मचारी, शिपाई तासन्तास बाहेर घालवतात. झेरॉक्स हेनिमित्त साधून ते त्यांची वैयक्तिककामे करतात. गणवेश नवापरण्याचे त्यामागील हे महत्त्वाचे कारण आहे.महापालिका कर्मचारी आहे, हे बाहेर कोणाच्याही सहज लक्षात येऊ नये, असा गणवेश न वापरण्यामागे त्यांचा स्वार्थी हेतू दडलेलाअसतो. स्वच्छ कारभाराचीघोषणा करणाºया सत्ताधारी भाजपाच्या ही बाब लक्षात येत नाही. अधिकाºयांची प्रशासनावरील पकड कमी झाली आहे़ तर पदाधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. याचाप्रत्यय पिंपरी-चिंचवड महापालिकेत येतो. पुणे महापालिकेच्याधर्तीवर अन्य गोष्टींचे अनुकरण केले जाते. शिस्तीच्या बाबतीत मात्रपुणे महापालिकेचे अनुकरण काकेले जात नाही? असा प्रश्ननागरिक उपस्थित करू लागलेआहेत.अधिकाºयांची फॅन्सी ड्रेससत्ताधारी राष्टÑवादी काँग्रेसच्या काळात पदाधिकाºयांच्या अधिक संपर्कात आलेले. त्यांचा प्रभाव पडल्याने त्यांच्यासारखे राहण्याचा प्रयत्न करणारे अधिकारी चक्क रंगीबेरंगी कपडे परिधान करून महापालिका भवनात वावरताना दिसून येतात. कोणी टी शर्टमध्ये तर कोणी स्टाईलिस्ट पेहराव करून आल्याचे निदर्शनास येते. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाºयांमध्ये शिस्त दिसून येते. मात्र लिपिकापासून अधिकारीपदापर्यंत पदोन्नती मिळविलेले अधिकारी त्यांच्या आवडीचे पेहराव करतात.
महापालिकेत बेशिस्तीचा कारभार; कामकाजाच्या काळात कार्यालयाबाहेर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 4:11 AM