लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात १२ वी परीक्षेत मुलींनी बाजी मारली असून तालुक्यातील गुणवत्तेचा टक्का वाढत असल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. तालुक्यातील सहा शाळा-महाविद्यालयांचा तिन्ही शाखांचा १०० टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेच्या पाच, वाणिज्य शाखेच्या सात आणि कला शाखेच्या दोन शाळा-महाविद्यालयात निकाल १०० टक्के लागला आहे.येथील इंद्रायणी महाविद्यालयाने निकालाची उच्च परंपरा यंदाही कायम राखली आहे. बारावीच्या परीक्षेत यंदा विज्ञान शाखेचा निकाल ९६ टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ९५ टक्के लागला आहे. तीनही शाखांमध्ये विद्यार्थिंनी बाजी मारली आहे. वाणिज्य शाखेत नलिनी संकपाळ (८७.६९ टक्के), कला शाखेत ऋषा दरेकर (८४ टक्के ) तर विज्ञान शाखेत निखिल तेलमसारे (८७.३८) टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आल्या आहेत. वाणिज्य शाखेत चैताली कराळे ८३.२३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर पूजा पडवळ ८३.०८ टक्के गुण मिळवून तृतीय आली. विज्ञान शाखेत प्राजक्ता रेऊर ८१.५३ टक्के गुणांसह द्वितीय, अखिलेश आवटे ७८.४६ टक्के गुणांसह तृतीय आला.कला शाखेत प्राजक्ता मांडे हिने ७६ टक्के गुण मिळवून द्वितीय तर ऐश्वर्या गवारे हिने ७३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हे यश कौतुकास्पद असल्याचे संस्थाध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे व कार्यवाह रामदास काकडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ, उपप्राचार्य सुनील ओव्हाळ आणि डॉ. एस. के. मलघे यांनी केले. विज्ञान शाखेत २८४ पैकी २७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्यमध्ये ३६४ पैकी ३४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.पवना कॉलेजचा ९७ टक्के निकालकाले : पवनानगर येथील लायन शांता मानेक पवना ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल ९६.६६ टक्के लागला आहे. पवना ज्युनिअर कॉलेजमधून परीक्षासाठी ९० विद्यार्थी बसले होते. त्यातील ८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम क्रमांक कृणाल रोहिदास वरघडे (७७.८४ टक्के) याने, द्वितीय क्रमांक विद्या रघुनाथ ठोंबरे (७७.३८) हिने, तृतीय क्रमांक तेजश्री सुरेश म्हसकर (७७.०७) हिने मिळविला. यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे आणि सचिव संतोष खांडगे यांनी केले. प्राचार्या प्रीती जंगले, प्रा. मोहन शिंदे, प्रा. वैशाली पाटील, ज्योती दौंड, प्रा. गोपीचंद कचरे, प्रा. गणेश ठोंबरे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.चांगला निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर पालक, शिक्षक, संस्थाचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विविध शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्था चालकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी विशेषत: मुली चांगले शैक्षणिक यश मिळवत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अधिकाधिक चांगल्या सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध झाल्यास यापेक्षा चांगले यश विद्यार्थी मिळवतील अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची सरशीशिवणे : येथील स्वामी विवेकानंद विकास प्रबोधिनी संस्थेचे स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षेत वाणिज्य शाखेचा निकाल ९६ टक्के लागला आहे. मुलींनीच पहिले तीनही क्रमांक पटकावून बाजी मारली आहे. ग्रामीण भागातील मुलींना अभ्यासाबरोबर घरातील इतर कामेही करावी लागतात. प्राचार्य फलीराम औटी, स्नेहल शिवणेकर, शीतल घारे, स्नेहल कालेकर यांनी मार्गदर्शन केले.प्रथम क्रमांक भाग्यश्री बाळासाहेब वाळुंज (८० टक्के गुण) हिने, द्वितीय क्रमांक अपर्णा शिवणेकर (७८.९२ टक्के) हिने आणि तृतीय क्रमांक अक्षदा भानुदास शिंदे (७७.३८ टक्के) हिने मिळविला. विद्यार्थ्यांचे प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ टिळे, सचिव धनंजय टिळे व ग्रामस्थांनी कौतुक केले.
मावळात मुलींनी मारली बाजी
By admin | Published: June 01, 2017 2:16 AM