शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

Pimpri Chinchwad: चिखलीत मोबाईल चोरल्याच्या संशयातून लाकडाने बेदम मारहाण करून एकाचा खून

By प्रकाश गायकर | Published: March 22, 2024 1:19 PM

फोन चोरी केल्याच्या संशयावरून वाद घालत एका व्यक्तीला लाकडाने बेदम मारहाण करत ठार मारले....

पिंपरी : मोबाईल फोन चोरी केल्याच्या संशयावरून वाद घालत एका व्यक्तीला लाकडाने बेदम मारहाण करत ठार मारले. ही घटना बुधवारी (दि. २०) सायंकाळी चिखली येथे घडली. महादेव विठ्ठल शिंदे (वय ४५, रा. मोरे पाटील चाळ, चिखली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राजू अनिल गांगुली (२८), विनोद शांताराम पवार (२२, दोघे रा. कुदळवाडी, चिखली) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक विजय पंचमुख यांनी चिखली पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू याच्या ओळखीच्या महिलेचा मोबाईल फोन महादेव शिंदे यांनी चोरी केल्याचा संशय होता. बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास चिखली मधील चौधरी वजन काट्याजवळ महिला महादेव शिंदे यांच्याकडे चौकशी करत होती. त्यावेळी राजू आणि विनोद तिथे आले. त्यांनी शिंदे यांच्यासोबत वाद करून हाताने मारहाण केली. राजू याने लाकडी बांबूने शिंदे यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तर विनोद याने लाकडी फळीने मारहाण करून शिंदे यांना ठार मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड