पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सपाटून अपयशाला सामोर जावे लागले. महापालिकेत भाजपाची सत्ता आली आहे. सत्ताधा-यांच्या कारभाराची झाडाझडती विरोधी पक्ष राष्ट्रवादीकडून घेतली जाणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी प्रशासनाची तारांबळ उडाली होती.महापालिकेतील अपयशानंतर सहा महिन्यांनी राष्टÑवादीच्या नेत्यांनी लक्ष घातले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी नऊला बैठक होणार आहे. यासाठी सुमारे २८ प्रश्नांची यादी राष्टÑवादीने प्रशासनास दिली आहे. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर राष्टÑवादीच्या कालखंडातील विकासकामांना ब्रेक लागला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर हे भाजपाचे प्रवक्ते असल्याचा आरोपही राष्टÑवादीच्या नेत्यांनी केला होता. त्यामुळे राष्टÑवादीच्या रडारवर महापालिका प्रशासन आहे.शहराचे रखडलेले प्रश्न अजेंड्यावरविरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने दिलेल्या प्रश्नांची माहिती घेण्यासाठी आयुक्त कार्यालयात अधिकाºयांची धांदल उडाली होती. या बैठकीत रुग्णालयांची रखडलेली कामे, भामा आसखेड प्रकल्प का रखडला, दिघीतील समूहशिल्प, पवना बंदिस्त जलवाहिनी सुरू करणे, बर्ड व्हॅली येथील लेझर शो, बस टर्मिनस, नवीन आरक्षणांचा विकास, रखडलेला बीआरटीएस प्रकल्प, अवैध बांधकामे, शास्ती वगळून मूळ कर भरून घेणे, रिंगरोड, संतपीठ, भक्ती-शक्ती उड्डाणपूल, स्वस्तात घरकुल आदी रखडलेल्या प्रश्नांचा आढावा घेण्यात येणार आहे.
कारभाराची झाडाझडती, प्रशासनाची तारांबळ, विरोधी पक्षाने पाठविली प्रश्नावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 4:09 AM