नेहरुनगर : शिवसेना शाखा संत तुकारामनगर हरी ओम प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महिलांच्या मनोरंजनासाठी होम मिनिस्टरफेम अभिनेते आदेश बांदेकर यांचा महा होममिनिस्टर ‘खेळ मांडियेला’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.संत तुकारामनगर येथे झालेल्या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख राहुल कलाटे, महिला शहर संघटिका सुलभा उबाळे, उपजिल्हा प्रमुख भगवान वाल्हेकर, गजानन चिंचवडे, रोमी संधू, राजेश वाबळे, वैशाली वाबळे, राजेश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर जगदाळे, विजय वाबळे, हेमंत मोरे, मनोज पाटील, विनोद वाघमारे, राहुल आल्हाट आदी उपस्थित होते.बांदेकर यांच्या हस्ते मंगलाताई कांबळे, गीता मंचरकर, डॉ. पूजा कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक शरद काळे, ईश्वर जगदाळे, दयानंद गवस यांना पुरस्कार देण्यात आला. आदेश बांदेकर व विभागप्रमुख राजेश वाबळे यांच्या हस्ते माया मोरे, संगीता महापती, कोमल घनवट, सुनंदा हांडे यांना पैठणी देण्यात आली. आयोजन शिवसेना शाखा, राजेश वाबळे युवा मंच व हरी ओम प्रतिष्ठान, हरी ओम महिला बचत गट यांनी केले. (वा.प्र.)
महिला दिनानिमित्त ‘खेळ मांडियेला’
By admin | Published: March 13, 2016 1:03 AM