थेरगाव : दत्तनगर येथील पद्मजी पेपर मिलसमोर पीएमपीच्या धावत्या बसच्या गियर बॉक्समधून अचानक आॅईल गळती झाल्याने भर रस्त्यावर आॅईल पसरले. त्यावरून दुचाकीस्वार घसरत होते. ही बाब थेरगाव सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. तसेच आॅईलवर माती टाकत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. त्यानंतर वाहन घसरून अपघात होण्याचे प्रकार थांबले.फाउंडेशनचे अनिकेत प्रभू व राहुल सरवदे, अथर्व धुमाळ, राहुल जाधव, सचिन भिंताडे, समीर येळवंड यांनी मोलाची भूमिका बजावली. बसचालक दिनेश गायकवाड, वाहक गणेश खुलासे यांनीही याकामी मदत केली. डांगे चौक- चिंचवड या मार्गावर पद्मजी पेपर मिलसमोर बसमधून अचानक आॅईल गळती झाल्याने बस बंद पडली. रस्त्यावर आॅईल पसरल्याने अपघाताला आयते निमंत्रण मिळाले. वाहने घसरून अनेक अपघात या ठिकाणी झाले. याबाबत थेरगाव सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळताच प्रसंगावधान राखत त्यांनी सांडलेल्या आॅईलवर माती टाकत अग्नीशामक दलाला पाचारण केले. वाहतूक पयार्यी मागार्ने वळवली. काही वेळातच रहाटणी येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याने रस्ता साफ करत वाहतुकीसाठी पूर्ववत केला. तरुणांच्या सतर्कतेमुळे अनेक अपघात टळले. त्यामुळे प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी या तरुणांचे कौतुक केले व आभार मानले.
थेरगाव येथे तरूणांच्या तत्परतेने टळले अनेक अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 5:12 PM
डांगे चौक- चिंचवड या मार्गावर पद्मजी पेपर मिलसमोर बसमधून अचानक आॅईल गळती झाल्याने बस बंद पडली. रस्त्यावर आॅईल पसरल्याने अपघाताला आयते निमंत्रण मिळाले.
ठळक मुद्देपीएमपी बसच्या गियर बॉक्समधून रस्त्यावर आॅईलगळती