शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

अपंग विकास महासंघामुळे अनेकांना लाभ

By admin | Published: March 28, 2017 2:37 AM

अपंग विकास प्रसार केंद्र महासंघाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक अपंगांना लाभ मिळाल्याचे

कामशेत : अपंग विकास प्रसार केंद्र महासंघाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक अपंगांना लाभ मिळाल्याचे येथील स्नेहमेळाव्यात सांगण्यात आले.महासंघाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त मावळ तालुक्यातील सर्व अपंग बांधवांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात रविवारी करण्यात आले. या मेळाव्याला सुमारे ३०० लोकांनी हजेरी लावली. मेळाव्याचे उद्घाटन महासंघाचे अध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते झाले. शासनाच्या अपंग बांधवांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. अपंग बांधवांची शासन व समाजाकडून होणारी कुचंबणा व ससेहोलपट व त्यावर करावयाची मात या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.तळागाळातील अपंगांच्या योजना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे लाभार्थींपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे अपंग बांधव या योजनांपासून वंचित राहतात. अनेक ठिकाणी अपंगांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी समाजातील सर्व अपंग बांधवांनी एकत्र येणे गरजेचे असल्याने २२ फेबु्रवारी २०११ रोजी तालुक्यातील अपंग बांधवांना एकत्र करून अपंग विकास प्रसार केंद्र महासंघाची स्थापना करण्यात आली. महासंघामुळे अनेक अपंग बांधव एकत्र आले असून, त्यामुळेच तालुक्यातील १८२ अपंग, विधवा, निराधारांना पेन्शनचा लाभ मिळाला. पंचायत समितीच्या माध्यमातून १२ टपरी प्रकरणे, समाजकल्याण विभागातून सात जणांना बीजभांडवल, खादीग्रामोद्योगामधून १५ जणांना लाभ, वित्त विकास महामंडळाकडून पाच जणांना लाभ, जिल्हा आरोग्य रुग्णालयातून २३५ जणांना अपंग प्रमाणपत्र महासंघाने मिळवून दिली.४० टक्के निधी कामशेतमधील ४६ लोकांना मिळवून दिला. वडगाव, कान्हे, परंदवडी, वेहेरगाव, कुसगाव, सदापूर, काम्ब्रे, करंजगाव, थोरण, जांभवली, नाणवली, गोवित्री, बौर, चिखलसे, साते, टाकवे, अहिरवडे, तळेगाव व लोणावळा नगर परिषद आदी भागांमधील पाठपुरावा सुरू असल्याची महिती महासंघाचे अध्यक्ष व सचिव यांनी दिली.महासंघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. उपाध्यक्ष विष्णू कांबळे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष गोकुळ लक्ष्मण सुरवसे, जिल्हाध्यक्ष सचिन जोशी, जिल्हा उपाध्यक्ष अकबर मैनुद्दीन शेख, आंबेगाव तालुकाध्यक्ष आशा रणपिसे, सहसचिव महाराष्ट्र कासम रसूल शेख, सचिव नितीन पवार यांना अध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रस्तावना संजय राठोड यांनी केली. जोशी यांनी सूत्रसंचालन व कासम शेख यांनी स्वागत केले. (वार्ताहर)