शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

खड्डा घालतोय अनेकांना ‘खड्ड्यात’

By admin | Published: November 26, 2015 12:53 AM

ग्रेड सेपरेटरमधील खड्डे आणि ‘मर्ज इन, मर्ज आऊट’ यामध्ये वारंवार होणारे बदल यामुळे ग्रेड सेपरेटरमध्ये अपघातांची जणू मालिकाच सुरू झाली आहे

मंगेश पांडे,  पिंपरीपिंपरी : ग्रेड सेपरेटरमधील खड्डे आणि ‘मर्ज इन, मर्ज आऊट’ यामध्ये वारंवार होणारे बदल यामुळे ग्रेड सेपरेटरमध्ये अपघातांची जणू मालिकाच सुरू झाली आहे. पिंपरीतील ग्रेड सेपरेटरमधील खड्ड्यांमुळे लागोपाठ दोन दिवसांत दोन अपघात झाले. विशेष म्हणजे दोन्ही अपघात त्याच खड्ड्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. पण तो खड्डा बुजविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने तत्परता दाखविली नाही. आणखी किती जण ‘खड्ड्या’त गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहे. जलद वाहतुकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी ते दापोडी दरम्यान साडेबारा किलोमीटर लांबीचा आणि २२ मीटर रुंदीचा ग्रेड सेपरेटर २००८मध्ये बांधण्यात आला. यामुळे निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून शहरात प्रवेश केल्यानंतर थेट पुण्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत आहे. अवघ्या बारा ते पंधरा मिनिटांतच निगडीहून दापोडीला पोहोचता येते. यामध्ये वाहनांचा वेगही अधिक असतो. मात्र, विविध ठिकाणी पडणारे खड्डे, ठिकठिकाणी सांडणारे आॅईल, यामुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटते. दरम्यान, अचानक ब्रेक दाबल्यास वेगातील मागील वाहने एकमेकांवर धडकण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. गेल्या दोन दिवसांत लागोपाठ दोन अपघात झाले. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही दिवसांपासून ग्रेड सेपरेटरमध्ये अपघातांची मालिकाच सुरू आहे. त्यामुळे या मार्गाने जाताना वाहनचालक चिंतेत पडतात. पुण्याहून निगडीकडे जाणाऱ्या मार्गावर पिंपरीतील बँक आॅफ इंडियासमोरील ग्रेड सेपरेटरमध्ये दोन खड्डे पडले आहेत. हे दोन्ही खड्डे वाहनांच्या दोन चाकामधींल अंतराइतकेच अंतरावर पडले आहेत. त्यामुळे ते चुकविणे वाहनचालकाला शक्य होत नाही. पर्यायाने चालक अचानक ब्रेक दाबतो. अशाच प्रकारे सोमवारी आणि मंगळवारी दोन अपघात या ठिकाणी घडले. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशाच प्रकारचे खड्डे ग्रेड सेपरेटरमध्ये अनेक ठिकाणी आहेत. हे खड्डे अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहेत. ग्रेड सेपरेटरमध्ये ठिकठिकाणी आत जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी ‘मर्ज इन, मर्ज आऊट’ ठेवण्यात आले आहेत. मात्र, विविध कारणांनी दर चार-पाच दिवसांनी ‘मर्ज इन’च्या ठिकाणी ‘मर्ज आऊट’, तर ‘मर्ज आऊट’च्या ठिकाणी ‘मर्ज इन’ असे बदल केले जातात. दरम्यान, भरधाव जात असताना रोजच्या सवयीनुसार वाहनचालक ‘मर्ज आऊट’च्या ठिकाणाहून बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच, त्या ठिकाणी ‘मर्ज इन’चा बदल केलेला असतो. अशा वेळी वाहनचालक गडबडतो अन् अचानक ब्रेक दाबल्यास अपघात होतो. या प्रकारे वारंवार होणाऱ्या बदलांमुळेही अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. पिंपरीतील ग्रेड सेपरेटरमध्ये सोमवारी आणि मंगळवारी लागोपाठ दोन अपघात झाले. विशेष म्हणजे दोन्ही एकाच ठिकाणी झाले. यासह सात महिन्यांपूर्वी काळभोरनगर येथे ग्रेड सेपरेटरमध्ये झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. चिंचवड स्टेशन येथे तीन महिन्यांपूर्वी पीएमपी कंपनीची वाहनदुरुस्तीची मोटार उलटली होती. तीन वर्षांपूर्वी मोरवाडी चौकाखालील गे्रड सेपरेटरमध्ये मालवाहू ट्रक खड्ड्यात उलटल्याने एकाचा मृत्यू झाला होता. यासह कासारवाडी ते दापोडी दरम्यानच्या मार्गावरही वारंवार वाहने घसरून अपघात घडत आहेत. पूर्ण मार्गावर दररोज एक तरी किरकोळ अपघात घडतो. दुचाकी उभी करून मोबाईलवर गप्पा मारणे, एसटी वा खासगी प्रवासी बस गे्रड सेपरेटरमध्येच उभी करून प्रवाशांना उतरविणे, बंद पडलेले वाहन वेळेत न हटविणे आदी कारणांमुळेही अपघात होत आहेत. वारंवार होणारे अपघात, ठिकठिकाणी बसविण्यात आलेले गतिरोधक यामुळे अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सेवा रस्त्याने जितका वेळ लागतो, तितकाच वेळ गे्रड सेपरेटरमधून लागतो. जलद वाहतुकीच्या हेतूला खीळ बसत आहे. जास्त उंचीचे कंटेनर अडकण्याच्या घटना तर नित्याच्याच आहेत. सर्वाधिक घटना पिंपरी चौकातील गे्रड सेपरेटरमध्ये घडत आहेत. ‘मर्ज इन’ असलेल्या ठिकाणी अधिक उंचीच्या वाहनांना सेपरेटरमधून जाण्यास बंदी असल्याचे फलक लावलेले असतानाही सेपरेटरमध्ये वाहने घुसविली जातात.