पिंपरी : मुलगी झाल्याने तसेच पैशाच्या कारणावरून विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी भोसरी येथे २६ एप्रिल २०१६ ते ५ जानेवारी २०२१ या कालावधीत ही घटना घडली.
नीलेश विठ्ठल नलावडे (वय ३२), विठ्ठल हरिभाऊ नलावडे (वय ५५), कविता विठ्ठल नलावडे (वय ५०, तिघेही रा. मिनी मार्केट समोर, एमआयडीसी भोसरी), गोरख शेलार (वय ४०), शितल गोरख शेलार (वय ३६, दोघेही रा. कोंढवा, पुणे), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित विवाहितेने रविवारी (दि. २३) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचा छळ केला. चारित्र्यावर संशय घेत तसेच फिर्यादीला मुलगी झाली म्हणून तसेच माहेराहून पैसे आणण्याची वारंवार मागणी करून त्यासाठी फिर्यादीला क्रूर वागणूक दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजश्री पावरा तपास करीत आहेत.