कामशेत : सासरच्या जाचाला कंटाळून सांगिसे येथील विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या बाबत विवाहितेचा पती, सासरा,सासू दीर यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सुप्रिया राहूल ढवळे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.कामशेतपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ( दि.१४ ) सकाळी सुप्रिया हिने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला उपचारासाठी सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, सुप्रिया मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तिच्यावर माहेरी महागाव ( आंदर मावळ ) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुप्रियाचे वडील भरत दत्तू जाधव ( रा.महागाव ) यांनी पोलीस तक्रार दिली आहे. या प्रकरणी पती राहूल लक्ष्मण ढवळे (वय ३१), सासू सावित्रीबाई लक्ष्मण ढवळे (वय ६०), सासरे लक्ष्मण गोविंद ढवळे (वय ६४), जाऊ शीतल स्वप्निल ढवळे (२४), दीर स्वप्निल लक्ष्मण ढवळे (वय २७) यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहीती पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी दिली.
कामशेत येथे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 19:42 IST
विवाहितेचा पती, सासरा,सासू दीर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात..
कामशेत येथे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देतिला उपचारासाठी सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल