शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

काळेवाडीतील गादी कारखान्यास आग, दोन जखमी, आठ ते दहा लाखांचे नुकसान

By विश्वास मोरे | Published: June 03, 2024 4:49 PM

अग्निशमन दलाचे आठ ते १० बंब घटनास्थळी तत्काळ दाखल झाले असून अवघ्या दीड तासांत अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले

वाकड : सकाळची साडे अकराची वेळ... सगळे आपापल्या कामात व्यस्त..., तेवढ्यात अग्निशमन दलाच्या गाड्यांचा आवाज काळेवाडीतील विजयनगर परिसरात घुमू लागला. येथील एका कारखान्याला सोमवारी भीषण आग लागली होती. कारखान्यात कपडे, गादी, कागद असा माल असल्याने त्याच्या धूराचे लोट उठत होते. अग्निशमन दलाचे आठ ते १० बंब घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यानंतर अवघ्या दीड तासांत अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीत दोन जखमी, दोन्ही कारखाने मिळून आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.  

काळेवाडी येथील विजयनगर परिसरातील कारखान्याला सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. हि आग विजयनगर परिसरात एकाच पत्र्याच्या शेडमध्ये दोन कारखाने आणि एक गोदामास लागली होती. तिथे कपडे, गाद्या अन् कागदी साहित्य होते. या शेडला सोमवारी सकाळी अकराच्या सुमारात भीषण आग लागली. वाऱ्यामुळे आगीने पेट घेतला आणि धूराचे लोळ दिसू लागले. त्यानंतर किनारा कॉलनी आणि शेजारील अरुंद रस्त्याने अग्निशमन दलाचे जवान आत गेले. याठिकाणी एमआयडीसी, स्मार्ट सिटी आणि पुणे शहरातून गाड्या मागवल्या होत्या. साधारणपणे दुपारी एक वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली. यावेळी धुराचे लोळ आणि येथील वातावरण भीतीदायक होते. तर आजू-बाजूच्या इमारतीमधील नागरिक घाबरून इमारतीच्या खाली येत होते.  रस्ता केले बंद  काळेवाडी कडून विजयनगरकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला होता. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलिस यांच्या गाड्यांव्यतिरिक्त कोणतीच गाडी आत सोडायला पोलिसांनी मनाई केली होती. आग लागलेला कारखाना सोसायटीच्या शेजारून जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना आत जाण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. तोपर्यंत साधारण आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात आणली गेली. या परिसरात एकच शेडमध्ये दोन कारखाने व गोदाम चालवले जात होते. गोदामात कपडे आणि गादीचे साहित्य होते. तर एका कारखान्यात कागदी, वापरा आणि टाका अशा प्लेट बनवल्या जात होत्या. 

निवासी भागात कारखाना आणि गोदाम  

सकाळी आकराच्या सुमारास शेडमध्ये आग लागल्याचे लक्षात आले. आणि नागरिकांनी अग्निशमन दलाला संपर्क केला. अग्निशमन दलाच्या गाड्यांचे आवाज येताच आजू बाजूच्या नागरिकांनी गर्दी केली. आधीच अरुंद रस्ता आणि नागरिकांची गर्दी यामुळे गाड्यांना वळायला अडचण निर्माण होत होती. पोलिसांनी गर्दी बाजूला करत गाड्यांना वाट करून दिली. धुराचे लोट हवेत दिसत होते. कारखान्याच्या आजू बाजूला मोठ्या प्रमाणात निवासी गृह प्रकल्प असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. निवासी जागेत कारखाना आणि गोदाम वापरा साठीशेड बांधली असून शेडपर्यंत जाण्यासाठी अरुंद रस्ता आहे. आग लागल्याचे वेळेत लक्षात आल्याने पुढील मोठी हानी टळली. 

एकाच शेडमध्ये दोन व्यवसाय 

बांधण्यात आलेल्या एकाच शेडमध्ये कारखाना आणि गोदाम असे दोन व्यवसाय सुरू होते. कागदी प्लेट बनवण्याचा कारखाना तर कापड आणि गादीचे गोदाम या ठिकाणी होते. त्यामुळे आगीत दोनही व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे. 

'' पुढील काही दिवसात गोदामांचे सर्वेक्षण केले जाईल. तसेच निवासी जागेत कारखाना कसा काय यासाठी सर्व गोष्टींची तपासणी करण्यात येईल. अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून योग्य ती खबरदारी पुढील काळात घेतली जाईल. '' - प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगपालिका

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलPuneपुणेWaterपाणीMONEYपैसा