शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
2
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
3
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
4
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
6
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
7
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
8
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
9
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
10
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
11
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
12
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
13
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
14
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
15
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
16
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
17
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
18
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
19
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
20
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत

Maval Vidhan Sabha Election Result 2024 Live: मावळ 'पॅटर्न फेल', अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके विजयी; लाखांच्या लीडने घड्याळ आले

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: November 23, 2024 12:57 IST

Maval Assembly Election 2024 Result Live Updates: मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि महायुतीतील नाराजांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार बापू भेगडे पराभूत

Maval Vidhan Sabha Election Result 2024 Live : मावळ विधानसभा मतदार संघात महायुतीतील नाराजांनी उदयास आणलेला मावळ 'पॅटर्न' फेल झाला आहे. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके विजयी झाले आहेत.  त्यांना एक लाख ८ हजार ५६५ मतांचे मताधिक्य मिळाले आहे.

मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि महायुतीतील नाराजांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारात झालेल्या लढतीमुळे मावळकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. या मतदार संघात ३२,३५८ म्हणजेच १.४३ टक्के मतदान वाढले आहे. या वाढीव मतदानाने मावळ  'पॅटर्न'ला धक्का दिला आहे. आमदार सुनील शेळके पूर्वी भाजपमध्येच होते. २०१९ मध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली. उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांना पराभूत केले. तेव्हापासून आमदार शेळके आणि मावळ भाजपमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष सुरू झाला. भाजपने मावळवर दावा केल्यानंतरही जागा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली. पवार यांनी शेळके यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आणि महायुतीत फूट पडली. भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जात असलेल्या बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने मावळ 'पॅटर्न' निर्माण झाला. 

इथं क्लिक करा >>महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचेच बापू भेगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उभे राहिले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पक्षाचे नव्हे तर पदाचे राजीनामे देत बापू भेगडे यांना जाहीर पाठिंबा दिला. महाविकास आघाडी, मनसेनेही बापू यांना पाठिंबा देत या 'पॅटर्न'ला बळ दिले. काही पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता भाजपचे संपूर्ण पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, दिवंगत किशोर आवारे यांची जनसेवा विकास आघाडी, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे काही पदाधिकारी बापू यांच्या प्रचारात उतरले होते. तर, शेळके यांनी जवळच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत किल्ला लढविला. नेते अपक्ष उमेदवारासोबत तर जनता शेळके यांच्यासोबत राहिल्याचे मतदानातून दिसून आले आहे. शेळके यांचा सलग दुसऱ्यांदा एकतर्फी विजय झाला आहे. शेळके २०१९ मध्ये ९४ हजार मतांनी विजयी झाले होते. 

दरम्यान, मावळ मतदार संघात ३,८६, १७२ मतदार आहेत. यापैकी १,४४,२१४ पुरूष, १,३६,१०२ महिला, इतर तीन अशा २,८०,३१९  म्हणजेच ७२.५९ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maval-acमावळMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीAjit Pawarअजित पवार