Maval Vidhan Sabha Election Result 2024: मावळात एकट्यानं किल्ला लढवला अन् पुन्हा विजय साधला; आघाडीचा मावळ पॅटर्न फेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 06:28 PM2024-11-24T18:28:06+5:302024-11-24T18:30:25+5:30

Maval Assembly Election 2024 Result स्वपक्षातील बंडखोरी, भाजपने थेट विरोधात केलेला प्रचार, महाविकास आघाडीने अपक्षाला दिलेला पाठिंबा अशा प्रतिकूल गोष्टींवर मात करत सुनील शेळके यांनी विजय खेचून आणला

Maval Vidhan Sabha Election Result 2024 Maval vidhan sabha sunil shelke won again The reasons for the defeat of the front | Maval Vidhan Sabha Election Result 2024: मावळात एकट्यानं किल्ला लढवला अन् पुन्हा विजय साधला; आघाडीचा मावळ पॅटर्न फेल

Maval Vidhan Sabha Election Result 2024: मावळात एकट्यानं किल्ला लढवला अन् पुन्हा विजय साधला; आघाडीचा मावळ पॅटर्न फेल

पिंपरी : मावळ मतदारसंघात महायुतीतील नाराजांनी उदयास आणलेला आणि महाविकास आघाडीने उचलून धरलेला ‘मावळ पॅटर्न’ फेल झाला आहे. पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या आणि जनसंपर्काच्या जोरावर राष्ट्रवादी अजित पवार गटच्या सुनील शेळके यांनी पुन्हा विजयी गोल केला. स्वपक्षातील बंडखोरी, भाजपने थेट विरोधात केलेला प्रचार, महाविकास आघाडीने अपक्षाला दिलेला पाठिंबा अशा प्रतिकूल गोष्टींवर मात करत त्यांनी एकट्याने विजय खेचून अणला.

मावळात अजित पवार गट आणि महायुतीतील नाराजांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारात लढत झाली. या लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. येथे मागील वेळेपेक्षा ३२,३५८ म्हणजेच १.४३ टक्के मतदान जादा झाले होते. पूर्वी भाजपमध्ये असलेल्या आमदार शेळकेंनी २०१९ मध्ये उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पराभूत केले. तेव्हापासून शेळके आणि भाजपमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष सुरू झाला. यंदा भाजपने दावा केल्यानंतरही ही जागा अजित पवारांच्या गटाला मिळाली. त्यांनी शेळके यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आणि महायुतीत फूट पडली. मात्र, महायुतीतील नेते अपक्षासोबत तर मतदार शेळके यांच्यासोबत राहिल्याचे मतदानातून दिसून आले आहे.

सुनील शेळकेंनी एकट्याने लढवला किल्ला

राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच बापूसाहेब भेगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पदाचे राजीनामे देत भेगडे यांना जाहीर पाठिंबा दिला. महाविकास आघाडी, मनसेने स्वत:चा उमेदवार उभा न करता अपक्षाला पाठिंबा देत या ‘पॅटर्न’ला बळ दिले. काही पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता भाजपचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, दिवंगत किशोर आवारे यांची जनसेवा विकास आघाडी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही पदाधिकारी भेगडेंच्या प्रचारात उतरले होते. शेळके यांनी विश्वासू पदाधिकाऱ्यांना सोबत घेत किल्ला लढवला.

शेळकेंच्या विजयाची कारणे

१) पाच वर्षांत केलेली विकासकामे
२) मतदारांशी असलेला थेट ‘कनेक्ट’
३) लाडकी बहीण योजनेचे मतांमध्ये रूपांतर करण्यात आलेले यश
४) विकासकामांचा प्रचारात योग्य वापर

भेगडेंच्या पराभवाची कारणे

१) मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचवण्यात अपयश
२) उशिरा भूमिका घेतल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यास उशीर
३) भाजपच्या पारंपरिक मतदारांनी फिरवलेली पाठ
४) शहरी मतदारांचा विश्वास संपादन करण्यात अपयश

Web Title: Maval Vidhan Sabha Election Result 2024 Maval vidhan sabha sunil shelke won again The reasons for the defeat of the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.