शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मावळच्या सत्तर लाख गुलाबांचा परदेशात दरवळ

By admin | Published: February 14, 2017 1:57 AM

मावळ तालुक्यातून या वर्षी व्हॅलेंटाइन डेकरिता तब्बल ७० ते ७५ लाख फुले परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यात आली.

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातून या वर्षी व्हॅलेंटाइन डेकरिता तब्बल ७० ते ७५ लाख फुले परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यात आली. यामध्ये टॉप सिक्रेट नावाच्या लाल रंगाच्या गुलाबाला परदेशी बाजारात मोठी मागणी आहे. तालुक्यात २५० हेक्टर क्षेत्रावर पॉली हाऊसच्या माध्यमातून गुलाबपुष्पाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी १५० ते १७५ हेक्टर क्षेत्रावरून परदेशी बाजारात व्हॅलेंटाइन डेकरिता फुले निर्यात केली जातात. या वर्षी सुमारे पाऊणकोटी गुलाब फुलांची निर्यात झाल्याचा अंदाज पवना फुलउत्पादक संघाचे वितरण प्रमुख मुकुंद ठाकर यांनी सांगितले. ठाकर म्हणाले, पवना फुलउत्पादक संघाच्या माध्यमातून २० एकर क्षेत्रात सहा लाख गुलाब फुलांचे उत्पादन करण्यात आले असून, यापैकी पाच लाख फुले प्रत्यक्ष परदेशी बाजारात निर्यात केली आहेत. २६ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान ही निर्यात झाली. या काळात सर्वच पॉलीहाऊसमध्ये गुलाबफुले पॅकिंगची धावपळ सुरु होती.मावळातील वातावरण या वर्षी गुलाबांकरिता पोषक राहिल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. रोगांचा प्रभावदेखील कमी राहिला. मात्र, परदेशी बाजारपेठेसह स्थानिक बाजारपेठेची मागणी काही प्रमाणात कमी राहिल्याने फुलांना परदेशी बाजारपेठेत सरासरी १२ ते १५ रुपये तर स्थानिक बाजारपेठेमध्ये ५ ते ७ रुपये भाव मिळाला. दर वर्षी पॉली हाऊस व फुल उत्पादनाचा खर्च वाढत असला, तरी त्या प्रमाणात बाजारभाव मिळत नाही अशी खंत ठाकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ३० एप्रिल २०१६ पासून शासनाने पॉलीहाऊसला दिले जाणारे अनुदान बंद केले असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. ते अनुदान पुन्हा सुरू करावे. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला स्थानिक बाजारपेठेसह परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून सहकार्य मिळाल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या पॉली हाऊसमधून मिळणारे उत्पादन लहान शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात कवडीमोल भावाने विकावे लागते. याकरिता पवना फुलउत्पादक संघाच्या माध्यमातून चंद्रकांत कालेकर, ज्ञानेश्वर ठाकर, ज्ञानेश्वर आडकर, विश्वनाथ जाधव व मुकुंद ठाकर या पाच शेतकऱ्यांनी एकत्र येत पॉलीहाऊसमधील माल परदेशी बाजारपेठेत विक्री करण्याची स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. त्या माध्यमातून सध्या परदेशी बाजारपेठेत दर दिवशी १५० बॉक्स फुले विक्री केली जात आहेत. (वार्ताहर)