शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
3
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
4
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
5
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
6
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
7
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
8
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
9
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
10
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
11
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
12
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
13
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
14
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
15
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
16
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
17
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
18
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
19
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
20
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

महापौर आले अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 3:16 AM

महापौर नितीन काळजे यांच्या मूळ जात प्रमाणपत्रावर सुनावणी घेऊन ते रद्द करावे व बोगस शालेय दाखला देणाºया मुख्याध्यापिका आणि जात प्रमाणपत्र देण्यासाठी कारणीभूत ठरणारे सर्व अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा आदेश समितीने द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते घनश्याम खेडकर यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापौर नितीन काळजे यांच्या मूळ जात प्रमाणपत्रावर सुनावणी घेऊन ते रद्द करावे व बोगस शालेय दाखला देणाºया मुख्याध्यापिका आणि जात प्रमाणपत्र देण्यासाठी कारणीभूत ठरणारे सर्व अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा आदेश समितीने द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते घनश्याम खेडकर यांनी केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या महापौरांचे पद धोक्यात येण्याची शक्यता आहे.पिंपरी-चिंचवडचे महापौर काळजे यांनी इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढवली होती. तसेच ओबीसीतूनच महापौरपदी आरूढ झाले. त्यांच्या विरुद्ध पराभूत उमेदवार घनश्याम खेडकर यांनी तत्काळ उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी याचिका दाखल केली. त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने काळजे यांची जात पडताळणी पुन्हा करवून घ्यावी, असा आदेश दिला. हे प्रकरण जात पडताळणी समिती, पुणे यांच्याकडे पुन्हा पडताळणीसाठी आले. समितीने दक्षता समितीच्या अहवालाशी असहमती दाखवत महापौरांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यामध्ये तुमचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द का करू नये अशी विचारणा केली. त्यानंतर पहिली सुनावणी झाली. पहिल्या सुनावणीच्या वेळेस तक्रारदार यांनी कागदपत्रांचा संपूर्ण संच अभ्यासासाठी मागितला व त्याच बरोबर ज्या अधिकाºयांनी जात प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचे दाखले दिले, त्यांना पुढच्या सुनावणीच्या वेळीस उलट तपासणीसाठी हजर करावे, ही मागणी केली. त्याच बरोबर तक्रारदार यांनी दक्षता पथकाकडे सादर केलेले साठ पुरावे तपासले नसल्याचे समितीच्या निदर्शनास आणून दिले.दक्षता पथकावरही प्रश्नचिन्हतक्रारदाराने आतापर्यंत दिलेली कागदपत्रे दक्षता पथकाने का तपासली नाहीत, अशी विचारणा केली. काळजे यांच्या शालेय प्रमाणपत्रावर महानगरपालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापिका यांनी बेकायदारीत्या खाडाखोड करून खोटे प्रमाणपत्र दिले. त्या मुख्याध्यापिका आणि तत्कालीन उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल व दक्षता पथकाचे अध्यक्ष घार्गे यांना उलट तपासणीसाठी का बोलावले नाही, अशी विचारणा केली होती. मात्र, तो आमचा अधिकार नाही असे सुनावणीत सांगण्यात आले.असे आहेत आक्षेपमहापौर काळजे, त्यांचे वडील, आजोबा, पणजोबा, चुलते व चुलतभाऊ यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांवर जातीची नोंद हिंदू-मराठा अशी आहे. ज्या मूळ पुरुषाची नोंद कुणबी म्हणून दाखवली आहे, त्या कागदपत्रांचे अधिकृतरीत्या मोडी लिपीतून मराठीत भाषांतर सादर केलेले नाही. ते व त्या मूळ पुरुषाची नोंद इतर कागदपत्रांमध्ये मराठा, मराठी अशी आढळून येते.मूळ जात प्रमाणपत्रावर सही तत्कालीन उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल यांची आहे. तसेच सहीमध्येही तफावत दिसत आहे व यावरील शिक्का हा दुसºयाच अधिकाºयाचा आहे. कार्यालयीन रजिस्टरमध्ये प्रमाणपत्र देणाºया अधिकाºयाचे नाव भालेदार आहे. दाखला वितरित केल्याची तारीख, जात व श्रेणी रजिस्टरमध्ये नोंद नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या कागदपत्रांच्या आधारे हा दाखला दिला. ती कागदपत्रे सरकारी दप्तरातून गहाळ झाली आहेत. मूळ जात प्रमाणपत्रावर तपासलेल्या कागदपत्रांची नोंद असते या दाखल्यावर कुठल्याही कागदपत्रांची नोंद नाही. काळजे यांनी शपथपत्रावर दिलेल्या वंशावळीत आपले सख्खे भाऊ, चुलत भाऊ व चुलते यांची माहिती लपवली आहे.फौजदारी करामूळ जात प्रमाणपत्रावर सुनावणी घेऊन ते रद्द करण्यात यावे व काळजे यांना बोगस शालेय दाखला देणाºया मुख्याध्यापिका आणि जात प्रमाणपत्र देण्यासाठी कारणीभूत ठरणारे सर्व अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश समितीने द्यावेत. त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे आणि त्यांच्यावर फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करावा. गावात उच्चवर्णीय म्हणून वावरायचे व आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी फक्त इतर मागासवर्गीय असणे हे दाखवायचे, इतर समाजांवर अन्याय करणारे आहे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांनाही याबाबत पत्र लिहिले आहे. महापौर सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांना वाचवण्यासाठी पडताळणी समितीच्या कामकाजामध्ये राजकीय हस्तक्षेप केला जाऊ शकतो, असेही खेडकर व मृणाल ढोले-पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.