- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पाणी कपातीचे धोरण टँकर लॉबीसाठी केली जात आहे, असा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला होता. हा आरोप महापौर नितीन काळजे यांनी खोडून काढला आहे. ‘पिंपरी-चिंचवड शहरात कोणत्याही प्रकारची टँकर लॉबी कार्यरत नाही. महापालिकेकडे दोनच टँकर आहेत. खासगी टँकर सुरू असतील तर त्याचा महापालिकेशी कसलाही संबंध नाही. त्यामुळे टँकर लॉबीच्या हितासाठी एका दिवसाआड पाणीपुरवठा केल्याचा आरोप खोटा आहे, असे महापौरांचे म्हणणे आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत कामगार दिनानंतर दिवसाआड पाण्याचे नियोजन केले आहे. महापालिका प्रशासनद्वारे योग्य पद्धतीने पाणीपुरवठा सुरू आहे, असा दावा करीत असले तरी वास्तव निराळेच आहे. ‘पवना धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना एका दिवसाआड पाणी देण्याचा महापालिकेचा निर्णय केवळ टँकर लॉबीला पाठीशी घालण्यासाठी घेतल्याचा आरोप खासदार बारणे यांनी केला होता. या आरोपाचे खंडण महापौर काळजे यांनी केले आहे. टँकरवरून महापौर आणि खासदारांत जुंपली आहे. महापौर म्हणाले, ‘‘पवना धरणात पाणीसाठा कमी असल्यामुळे पाणी कपातीचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार दोन मेपासून शहरात एका दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. कोणत्याही प्रकारची टँकर लॉबी कार्यरत नाही. महापालिकेचे केवळ दोन टँकर आहेत. खासगी टँकर सुरू असतील तर त्याचा महापालिकेशी कसलाही संबंध नाही. टँकर लॉबीसाठी पाणी कपातीचा निर्णय घेतला म्हणने चुकीचे आहे.’’