पिंपरी : राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर व उपमहापौर यांना तीन महिन्यांची दिलेली मुदतवाढ संपत आली आहे. मात्र, राज्यात सत्ता स्थापनेचा गोंधळ सुरू असल्यामुळे महापौर आरक्षण सोडत रखडली आहे. त्यामुळे विद्यमान महापौर व उपमहापौर यांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरपदासाठी इच्छुक असलेल्यांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. विधानसभा निवडणुका होऊन १५ दिवस झालेतकरी राज्यातील सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शहराचे विद्यमान महापौर राहुल जाधव व उपमहापौर सचिन चिंचवडे यांना आणखी काही काळ मुदतवाढ मिळण्याची आशा आहे. पिंपरी महापालिकेतील ओबीसी आरक्षणानुसार अडीच वर्षाच्या कार्यकालानुसार महापौर नितीन काळजे व राहुल जाधव यांना संधी मिळाली. ओबीसी आरक्षण असलेल्या महापौरांचा कार्यकाल आॅगस्ट महिन्यात संपुष्टात आला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापौर बदल नको, म्हणून सरकारने तो पुढे ढकलला. राज्य शासनाने २२ आॅगस्ट २०१९ रोजी काढलेल्या आदेशानुसार त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. ही मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत आहे. निवडणूक कार्यक्रमासाठी मुदतीपूर्वी पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. दरम्यानच्या काळात महापालिका प्रशासनाने निवडणूक कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे. परंतु, अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. नगरविकासविभागाकडून पुढील महापौरपदासाठी आरक्षण सोडत झाल्याशिवाय निवडणूक कार्यक्रम निश्चित केला जाणार नाही. तर, नवीन सरकार स्थापनेचा पेच सुटल्याशिवाय आरक्षण सोडत काढली जाणार नाही. .........निवडणूक कार्यक्रम निश्चित नाहीनगरविकास विभागाकडून पुढील महापौरपदासाठी आरक्षण सोडत झाल्याशिवाय निवडणूक कार्यक्रम निश्चित केला जाणार नाही. तर, नवीन सरकार स्थापनेचा पेच सुटल्याशिवाय आरक्षण सोडत काढली जाणार नाही. त्यामुळे ही निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे इच्छुकांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. मात्र, विद्यमान पदाधिकाºयांना आणखी काही दिवस कामाची संधी आहे..........विद्यमान महापौर यांना अभय ४महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार नवीन महापौर, उपमहापौर निवड होईपर्यंत विद्यमान पदाधिकारी पदावर राहतील. राज्यात सत्ता स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे महापौर पदाचे नवीन आरक्षण सोडत झालेली नाही. आरक्षण सोडत झाल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया राबविता येणार नाही. त्यामुळे आणखी काही दिवस विद्यमान महापौर राहुल जाधव यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील सत्ता स्थापनेच्या गोंधळात महापौर आरक्षणाची सोडत रखडली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 1:58 PM
राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर व उपमहापौर यांना तीन महिन्यांची दिलेली मुदतवाढ संपत आली आहे
ठळक मुद्देइच्छुकांच्या वाट्याला प्रतीक्षा : पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता