पिंपरी : शहरातील खड्ड्यांची परिस्थिती काय असा प्रश्न महापौरांनी विचारल्यानंतर त्यावर ‘खड्डे नाहीत’ असे उत्तर शहर अभियंत्यांनी दिले होते. त्यानंतर दोन दिवसांत खड्डे न बुजविल्यास कारवाई केली जाईल, अशी तंबी महापौर यांनी प्रशासनास दिली. त्यानंतर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांनी शहरातील विविध भागांत पाहणी करून खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू केली आहे.महापालिकेत महापौर नितीन काळजे आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आढावा बैठक गुरुवारी घेतली. त्या वेळी खड्ड्यांविषयी शहर अभियंता अंबादास चव्हाण यांना विचारले असता शहरात फारसे खड्डे नाहीत, असे विधान केले होते. माध्यमांनी याबाबतचे वास्तव मांडल्यानंतर महापौरांनी पुन्हा अधिकाºयांकडे विचारणा केली़ शुक्रवारी सकाळपासून अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, शहर अभियंता चव्हाण यांनी कासारवाडीतून रस्त्यांची पाहणी करण्यास सुरुवात केली. चिंचवड, पिंपरी, निगडी, थेरगाव, वाकड, भोसरी, चिखली, तळवडे, आकुर्डी वाल्हेकरवाडी आदी परिसराची पाहणी केली.‘लोकमत’कडून पोलखोल‘लोकमत’ने अधिका-यांच्या विधानाचा पोलखोल केल्यानंतर आज सकाळपासूनच प्रशासनाची खड्डे बुजवण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून आले. महापालिका यंत्रणा कामाला लागली होती. पाऊस सुरू असतानाही खड्डे भरण्याचे काम सुरू होते.
महापौरांनी खड्ड्यांवरून अधिकाऱ्यांना धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 2:11 AM