पिंपरी : पुण्यात र्होडिंगचा सांगाडा पडून नागरिकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर महापौर राहुल जाधव यांनी शुक्रवारी तातडीची बैठक घेतली. शहरातील अनधिकृत र्होडिंगचे सर्वेक्षण करण्यात यावेत. तसेच कालबाह्य होर्डिंगचे स्ट्रक्चर आॅडिट करावे करून धोकादायक वअनधिकृत फ्लेक्सवर तातडीने कारवाई करावी, असा आदेश महापौरांनी प्रशासनास दिला.
भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेत आल्यानंतर तत्कालीन स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी अनधिकृत र्होडिंगविषयी दंडात्मक कारवाईचे धोरण आणि सर्वेक्षण करण्याचा विषय आणला होता. मात्र, सभापतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर फ्लेक्सबाबतचा विषय मागे पडला होता.दरम्यान, पुण्यात शुक्रवारी र्होडिंग पडून चार जणांना जीव गमवावा लागला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर दालनात तातडीची बैठक झाली. या वेळी सहायक आयुक्त विजय खोराटे व जाहिरात एजन्सीचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. महापौरांनी शहरातील परवानाधारक आणि विनापरवाना र्होडिंगची माहिती घेतली.जाहिरात धोरणामुळे उत्पन्नात वाढशहरातील सर्व अनधिकृत फलक, र्होडिंग तातडीने काढावेत, विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांबरोबरच संबंधित एजन्सीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या कारवाईसाठी पोलीस आयुक्तालयाकडून बंदोबस्त मागवून घ्यावा. महापालिकेमार्फत फलक लावण्याचे धोरण आणि दंडात्मक कारवाई कशी करणार याबाबत धोरण ठरविल्यास महापालिकेस अधिक उत्पन्न मिळेल.पिंपरी- चिंचवड शहरात अनधिकृत फलक, र्होडिंग लावल्याने बकालपणा येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभाग व जाहिरात कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. पावसाळ्यात र्होडिंग नीट न लावल्याने दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामुळे परवानगी घेऊनच व्यवस्थित र्होडिंग लावावेत. फलक, र्होडिंग उभारण्याबाबत महापालिकेने धोरण ठरविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.- राहुल जाधव, महापौर